आॅनलाईन लोकमतशेंदुर्णी : येथील पहूर रस्त्यावर असलेल्या नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजवर शुक्रवार ६ रोजी पहाटे २: २० वाजता ४ अज्ञातांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाखांची रोकड पळविली. दरोडेखोरांनी दीपक अग्रवाल यांच्या मानेवर तलवार ठेवून ही लुटली. या प्रकरणी दीपक रमेशचंद्र अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून ४ अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.शेंदुर्णी येथे गुरुवारी दुपारपासून अचानक विद्युत प्रवाह बंद झाला. संपूर्ण रात्रभर वीज नसल्याने ४ भामट्यांनी नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजवर दरोडा टाकला. या घटनेत चोरट्यांनी तीन लाखांची रोकड लंपास केली.नर्मदा कॉटन इंडस्ट्रीज मध्ये सर्व जण काम आटोपून रात्री १२ वाजता झोपले. रात्रपाळी कामावर असलेल्या नागरिकांना पहाटे २ : २० च्या सुमारास अंधारातून अचानक २ माणसांनी चाकू व तलवार धाक दाखविला. मालक दीपक रमेशचंद्र अग्रवाल यांच्याकडे नेले. याठिकाणी अग्रवाल यांच्या मानेला तलवार लावून कपाटातून पैसे तुम्ही काढून द्या अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी तात्काळ स्वत:च्या हाताने ३ लाखांची रोकड पिशवीत टाकून दिली. बाहेरून समोरील दरवाजाला दोन्ही बाजूला कडी लावून सकाळी २ : ३५ ला चोरटे गायब झाले. जिनिंगच्या परीसरात ३० -३५ मजूर झोपलेले असतांना प्रकार घडला. दरवाजा उघडण्यासाठी फोन केला. तेव्हा मजूरांना झालेला प्रकार समजला.
शेंदुर्णीत मानेवर तलवार ठेवत दरोडेखोरांनी ३ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:48 PM
नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजच्या मालकाला धमकी देत लांबविली तीन लाखांची रक्कम
ठळक मुद्देनर्मदा कॉटन इंडस्ट्रीजवर दरोडा टाकला४ अज्ञातांनी शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाखांची रोकड पळविलीशेंदुर्णी येथे गुरुवारी दुपारपासून अचानक विद्युत प्रवाह बंद