जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे शिरसोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोजचे वितरण करण्यात आले. रोटरी सेंट्रलचे सदस्य राजेंद्र पिंपळकर यांचे यासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासर, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अग्रवाल, आरोग्य सेवक नीलेश चौधरी, अनिल महाजन, आरोग्य सेविका रेणुका आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
=================
पालकांना प्रतीक्षा लॉटरीची
जळगाव : आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी जिल्हाभरातून पाच हजाराच्यावर अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. दरम्यान, आता प्रतीक्षा आहे ती लॉटरी जाहीर होण्याची. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविले जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होवून त्यांचे प्रवेश निश्चित केले जातील.
=======================
चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
जळगाव : रोटरी क्लब जळगाव तर्फे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोहाडी येथील शासकीय रुग्णालयास चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या. यापूर्वी रोटरी क्लब जळगावतर्फे दोन ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमास रोटरी अध्यक्ष जितेंद्र ढाके, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. जयंत जहागिरदार, आसिफ मेमन, सेवारथ संस्थेचे दिलीप गांधी, वर्धमान संघवी व युसूफ भारमल यांची उपस्थिती होती.
=========================
रायसोनीत गुरुवारी आंतरराष्ट्रीय परिषद
जळगाव : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्यावतीने गुरूवार, ८ एप्रिल रोजी ऑनलाईन आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात होणार आहे. खानदेशात प्रथमच फ्युचर ऑफ बिजनेस मॅनेजमेट अॅन्ड इकॉनॉमिक्स या विषयांवरील परिषद होणार आहे. या वेळी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे अध्यक्षस्थानी असतील.