जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि प्रभाकर कला संगीत अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे आजी-आजोबांसाठी ‘भक्तिरंग ज्येष्ठांसंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्तिक महिन्यातील जळगावच्या रथोत्सव अर्थात लोकोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ व्यक्तींसाठी अभंग-भजन यावर आधारित नृत्य संगीत यांची ही मैफील होती. कार्यक्रमात अयगिरी नंदिनी महिषासुरमर्दिनी स्त्रोत, कृष्ण भजन, मधुराष्टक्रम, सुंदर ते ध्यान, मीरा भजन, ध्यान लागले रामाचे, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, अबीर गुलाल उधळीत रंग, अवघे गर्जे पंढरपूर आदी अभंग व भजनांवर मधुरा इंगळे, वाग्मयी देव, श्रावणी उपासनी, दीपिका घैसास, मृण्मयी कुळकर्णी, हिमानी पिले, ऋतुजा महाजन, राधिका सरोदे यांनी कथ्थक नृत्य सादरीकरण केले. सूत्रसंचालन अपूर्वा दामले हिने केले. तर प्राजक्ता वैद्य यांनी आभार मानले.
प्रारंभी आनंदाश्रमातील एक आजी व आजोबा यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. अध्यक्षा प्रा. डॉ.अपर्णा भट-कासार यांनी प्रास्ताविकात भूमिका विशद केली.
कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे मानद सचिव जितेंद्र बरडे, माजी अध्यक्ष विष्णू भंगाळे, महेंद्र रायसोनी, ओम अग्रवाल, महेंद्र गांधी, दिलीप लुणिया, कीर्ती जैन, आनंद दामले, जी.आर. चौधरी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या गांधी मीना लुणिया, साधना दामले, डॉ. विद्या चौधरी, वरद वैद्य व मातोश्री आनंदाश्रमाच्या छाया पाठक आदींची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी रोटरी सेंट्रलच्या सांस्कृतिक समिती सदस्य व प्रभाकर कला संगीत अॅकेडमीचे सहकारी यांनी योगदान दिले.