जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊनने नागझिरा जंगलातील आदिवासी बांधवांना हिवाळ्याच्या थंडीत ब्लँकेट्स, स्वेटर्स, साड्या, कानटोप्या आदी प्रकारचे ९०० कपडे देऊन जणू मायेची ऊब दिली आहे.
रोटरी मिडटाऊनने नागझिरा जंगलातील पाच आदिवासींची गावे या कपडे दान प्रकल्पासाठी दत्तक घेतली होती. या प्रकल्पात रोटरी सहप्रांतपाल डॉ. अपर्णा मकासरे, रोटरी मिडटाऊनचे आनंद खांबेटे, डॉ. रवि महाजन, रमेशचंद्र जाजू, अनिल डी.अग्रवाल, किशोर सूर्यवंशी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, संजय बारी, डॉ. सुमन लोढा, सुरेखा शिरोळे, सुनंदा देशमुख आदींसह इतरही अनेक सदस्यांनी योगदान दिले.
यशस्वीतेसाठी मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ. रेखा महाजन, मानद सचिव शशी अग्रवाल यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.