ऑनलाईन लोकमत
आडगाव ता. चाळीसगाव,दि.10 - गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशी, बाजरी, ज्वारी, मका इत्यादी पिके पाण्याअभावी कोमजू लागलेले आहेत. कपाशी कोमेजून वाया जात असल्याने भाऊसाहेब आनंदा पाटील या शेतक:यांने दोन एकर क्षेत्रावरील कपाशीवर सोमवारी रोटाव्हेटर फिरविला.
नवीन पेरणीसाठी पुन्हा पावसाची प्रतीक्षा
आडगाव परिसरात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. बहुतांश शेतक:यांनी कुणी रोटाव्हेटर फिरविला तर कुणी नांगरही, वखरही फिरविली. कपाशी लागवडीचा कालावधी निघून गेल्याने आता त्या जागेवर कशाची पेरणी करावी असा प्रश्न या शेतक:यांना पडला आहे.
मका, ज्वारी, बाजरी पिकांची 70 टक्के पेरणी वाया
कपाशी बरोबर मका, बाजरी, ज्वारी या पिकांची पेरलेल्या क्षेत्रापैकी 30 ते 40 टक्केच क्षेत्रावर उगवण झाली आहे. बाकीचे क्षेत्र पावसाअभावी कोमजून वाया गेले.
गेल्या वर्षी उडीद, मूग, तूर लावल्यापासून वेळोवेळी पाऊस पडत गेल्याने प्रत्येक शेतक:याला चांगले उत्पन्न झाले होते. मात्र या वर्षी लागवड केल्यापासून त्यावर पाऊसच नसल्याने ही पिकेही कोमजून वाया जात आहेत. काही शेतक:यांनी दुबार, तिबार लागवड करून देखील उपयोग झाला नाही त्यामुळे यावर्षी सदर पिकांवर अस्मानी संकट कायम आहे.