Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:19 PM2018-09-19T13:19:36+5:302018-09-19T13:20:11+5:30

अन्न दानाबाबत जनजागृती

Rotoract will collect the remaining food in Jalgaon | Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात सभंडाऱ्यातील शिल्लक अन्न गोळा करणार रोटरॅक्ट

googlenewsNext

जळगाव : गणेशोत्सवानंतर भंडाºयाच्या कार्यक्रमातील शिल्लक अन्न पदार्थ गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याचे काम रोटरॅक्टकडून केले जाणार असून यासाठी मंडळांशी संपर्क अभियान सुरू असल्याची माहिती अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी दिली.
भंडाºयाचा कार्यक्रम दरवर्षी गणेश मंडळांकडून आयोजित केला जात असतो. भंडारा म्हणजे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. बट्टी, वरण, भात व वांग्याची भाजी,त्या जोडीला गोड शिरा असा मेनू मंडळांकडून या उत्सवात केला जातो. गणेशोत्सवाचे आता चार दिवस उरले आहेत. त्यामुळे भंडाºयाचे नियोजन सुरू झाले आहे. गणेशोत्सवानंतर दुसºया-तिसºया दिवशी किंवा रविवार पाहून हा कार्यक्रम साजरा केला जातो. या उत्सवात मोठ्या प्रमाणात अन्न दान केले जाते. नागरिक सहभागीही होतात मात्र उरसलेले अन्न काही ठिकाणी टाकून दिले जाते. हा प्रकार टळावा असे रॉटरॅक्टच्या पदाधिकाºयांचे प्रयत्न आहेत.
रोटरॅक्टचे अभियान
रोटरॅक्टकडून वाया जाणारे अन्न वाया जाऊ नये यासाठी एक उपक्रम राबविला जाणार आहे. मंडळांनी त्यांच्याकडील शिल्लक अन्न रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांच्या ताब्यात द्यावे व क्लबचे पदाधिकारी हे अन्न ठिकठिकाणी बसणाºया गरीबांना तसेच, वृद्धाश्रम, अंधशाळा अशा ठिकाणांवर पोहोचविणार आहे. कोणीही उपाशी राहू नये, अन्न वाया जाऊ नये यासाठी क्लबचे प्रयत्न असून यासाठी विविध मंडळांकडून माहिती घेणे सुरू करण्यात आले आहे. काही मंडळींकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जयवर्धन नेवे यांनी सांगितले. तसेच मंडळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Rotoract will collect the remaining food in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.