वरणगाव, ता. भुसावळ : येथील बोदवड रोडवरील आरती फेब्रिकेटर्सच्या मागे रेल्वेच्या लाईच्या हद्दीत एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत २५ रोजी आढळून आला.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, वरणगाव रेल्वे स्टेशनपासून थोड्या अंतरावर खांबा नंबर ४५७/८ जवळ पाण्याच्या चारीत काटेरी झुडपात अंदाजे ३५ ते ४० वयोगटाच्या एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने काळ्या रंगाची पँट व कथ्या रंगाचे बनियान परिधान केले होते. प्रेत कुजल्यामुळे त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. वरणगाव पोलीस व नगर परिषद कर्मचारी यांच्या सहकाऱ्याने दफनविधी करण्यात आला.
याबाबत संजय रमेश इंगळे यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागेद्र तायडे करीत आहेत.