जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी ८ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर ज्या १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यांच्यासाठी फेरनिविदा काढण्यात येत आहे. ३० जानेवारीपासून ही निविदा प्रक्रिया सुरू झाली असून १६ फेब्रुवारी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.
पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला.
मात्र जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली जात आहे. याला ३० जानेवारी रोजी सुरुवात झाली असून ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता निविदा उघडण्यात येणार आहे.