मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर १ ते ७ जूनच्या दरम्यान रिपाइंतर्फे जाहीर करण्यात आले आहे. कोरोना प्रसाराचे सर्व नियम व अटी पाळून गर्दी न करता आंदोलन करण्यात येणार आहे. मागासवर्गीयांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या या कुचकामी आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी रामदास आठवले यांच्या आदेशाने, तसेच प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष रामेश मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, खान्देश विभाग अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याची माहिती रिपाइं (आठवले) जळगाव लोकसभा जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंद खरात, भगवान सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सरचिटणीस मिलिंद तायडे यांनी दिली.
पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आरपीआयचे उद्यापासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:13 AM