आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत केल्याप्रकरणी आर.आर. विद्यालयातील मुख्याध्यापकांसह इतर डझनभर शिक्षकांचे नाशिकहून आलेल्या विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे चार तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सहसचिव मच्छिंद्र कदम यांच्यासह चार अधिका-यांनीही चौकशी केली.हे पथक विद्यालयात पोहचताच याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे या विषयी शहरात व शिक्षक वर्गात चर्चा सुरु होती.रावसाहेब रुपचंद लाठी विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांना शाळेतील सीसीटीव्ही बंद करुन, शिक्षकानींच कॉपी पुरविल्या होत्या. दरवर्षी शाळेचा निकालाची टक्केवारी घसरत असल्यामुळे, गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रवृत्त केले होते, अशी पुराव्यानिशी तक्रार संस्थेचे प्रभारी अध्यक्ष दिलीप लाठी यांनी माध्यामिक शिक्षणाधिकारी यांच्यासह महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षांकडे केली होती. तसेच या संदर्भात न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यांच्या या तक्रारीवरुन शिक्षण विभागाने नाशिकच्या शिक्षण संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार हे पथक दाखल झाले.पथकाने या ठिकाणची केली पाहणीगुरुवारी दुपारी साडेतीन वाजता हे पथक शासकीय वाहनातून थेट शाळेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेले. तेथे काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष असलेले दिलीप लाठी यांच्याकडून अर्धातास माहिती घेतली. तसेच त्यांना सोबत घेऊनच, ज्या ठिकाणी कॉपीचा प्रकार घडला, त्या वर्ग खोल्याची, तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यासह शाळेत शिरण्यासाठी संरक्षक भितींला ठिकठिकाणी पाडलेल्या छिद्रांची देखील पाहणी केली. विशेष म्हणजे या भितींचे मोबाईलमध्ये फोटो देखील अधिकाºयांनी काढले. शाळेची पाहणी करत असताना, हातात पेन-वही घेऊन निरीक्षण नोंदविताना दिसून आले. यावेळी माजी अध्यक्ष अरविंद लाठी हेही उपस्थित होते.सहसचिवांसह ४ अधिकाºयांचा पथकात समावेशसहसचिव मच्छिंद्र कदम, सहायक सचिव वाय.जी. निकम, निरंतरचे शिक्षणाधिकारी एस.जी. मंडलीक, धुळे येथील प्रदीप अहिरे यांचा या पथकात समावेश होता. चौकशी व जबाब घेतल्यानंतर हे पथक रात्री नाशिककडे रवाना झाले.या शिक्षकांचे नोंदविले जबाबशिक्षकांना चौकशीला उपस्थित राहण्यासाठी आठवडाभरापूर्वी घरपोच नोटीसा पाठविल्या होत्या.त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापिका विजया काबरा यांच्यासह शिक्षक पी. के. चव्हाण, रमेश पिले, के. टी. वाघ, डी.बी. पांढरे, आर.एस.पोनवळे, आर.एम.झंवर, बी.ए. अत्तरदे, बी.ए.पानपाटील, आर.बी. महाजन, जगदीश चव्हाण, प्रतिभा याज्ञीक या शिक्षकांची सुमारे साडे चार तास चौकशी करुन, जबाब नोंदविले. तसेच चौकशीला येण्यासाठी नोटीस पाठवूनही गैरहजर राहणाºया इतर शिक्षकांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काय नोंदविले जबाब?शाळेत कधी पासून सेवेला सुरुवात केली, शिक्षण काय झाले, कुठले विषय शिकवितात, कॉपी प्रकरण कसे घडले, परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे का बंद ठेवले, निकालाची टक्केवारी कशी घसरली, संस्थेच्या संचालकांशी तुमचे वाद आहेत का? अशा प्रकारचे विविध प्रश्न विचारुन जबाब नोंदविले.शहरातील नामांकित संस्था अशी शाळेची ओळख असताना, काही शिक्षकांनी दहावीच्या परिक्षेच्या वेळेस कॉपी सारखा गैरप्रकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात तक्रार केली होती, त्याची दखल घेण्यात आली आहे.-दिलीप लाठी, प्रभारी अध्यक्ष, इस्ट खान्देश एज्यु.सोसायटीचौकशी अहवालानंतरच पुढील कारवाई होणारविद्यार्थ्यांना कॉपी सारखा गैरप्रकार करण्याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी आम्ही चौकशीसाठी नाशिकहून आलो आहोत. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण चौकशीनंतर त्या संदर्भातील अहवाल शिक्षण संचालकांना सादर करणार आहोत. त्यानंतरच पुढील कारवाई होईल.-मच्छिंद्र कदम, सहसचिव, माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभाग
जळगावातील आर.आर. विद्यालयातील कॉपी प्रकरणी साडेचार तास चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:48 PM
तक्रारीची दखल
ठळक मुद्देनाशिक येथून आले पथकचार अधिका-यांनीही केली चौकशी