अजय कोतकरचाळीसगाव - कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १४०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. मागील वर्षी दर कोसळल्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. इतर राज्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील कांदा लवकर संपला आता केवळ महाराष्ट्रातील शेतकºयांकडे कांदा शिल्लक आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कांदा भाव खाणार आणि शेतकºयाला दोन पैसे अधिकचे मिळणार आहे .कांद्याला मे आणि जून महिन्यात मागणी असते.पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी कमी होते. पावसाळी हवामानाचा त्या कांद्यावर परिणाम होऊ नये यासाठी शेतकरी चाळीत कांदा ठेवतात. यावर्षी मध्यप्रदेशात देखील उत्पादन कमी झाले आहे. महाराष्ट्रातून देशातील इतर राज्यात कांद्याची मागणी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळत होता. मात्र आता दिवसेंदिवस कांद्याच्या भावात वाढ होत आहे. कांद्याने दीड हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठल्याने आता टप्याटप्याने मर्यादित तेजी येईल असा अंदाज व्यापाºयांकडून वर्तविला जात आहे.गेल्यावर्षी विक्रमी उत्पादनवर्षभरापासून कांद्याला १ हजार रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. काही वर्षांचा अनुभव पाहता उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो. गेल्यावर्षी राज्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाल्याने भाव कोसळले होते.
शेतकऱ्यांना रडविणारा कांदा यंदा हसवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:42 PM
कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
ठळक मुद्देबाजार समितीत कांद्याच्या भावात तेजीवाढीव भावामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवितदेशभरात कांद्याची मागणी वाढली