भुसावळ : जंक्शन रेल्वेस्थानक शिवाय ऑर्डनन्स व दीपनगर प्रकल्पामुळे देशाच्या कानाकोप:यात भुसावळची ओळख आहे. शिवाय कॉस्मोपॉलिटिन शहर, कामगार चळवळीचे केंद्र असलेल्या भुसावळचा सर्वदूर दबदबादेखील आहे. मात्र अस्वच्छतेबाबत देशात चक्क दुस:या क्रमांकावर भुसावळचे नाव जाहीर झाल्यानंतर नागरिकांमध्ये पालिकेसह सत्ताधा:यांविरुद्ध तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आह़े केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने एक लाखांवर लोकसंख्या असलेल्या 434 शहरांचा 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान सव्र्हे केला होता़ भुसावळ शहराचाही त्यात समावेश होता़ केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्ली येथे गुरुवारी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सव्रेक्षणाची यादी जाहीर केली़दोनदा दिली समितीने भेटजानेवारी महिन्यात एकदा व 7 फेब्रुवारी रोजी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे वरिष्ठ सहायक रवी पवार यांनी शहराला भेट देऊन सार्वजनिक शौचालयांसह शहर स्वच्छतेची पाहणी केली होती़सोशल मीडियावर टीकेची झोडगुरुवारी दुपारी अस्वच्छतेबाबत पालिकेचा चक्क देशात दुसरा क्रमांक आला. व्हॉटस्अॅप व फेसबुकवर पालिका प्रशासन व सत्ताधा:यांवर टीकेची चांगलीच झोड उठली़ अनेकांनी पालिकेच्या पदाधिका:यांचे आता चौका-चौकात बॅनर्स लावावेत, असा सल्लाही दिला तर निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची आठवणदेखील करून दिली़ एका महिनाभरात विकासकामे न केल्यास सामूहिक राजीनामे देऊ या आश्वासनांचीदेखील आठवण करून देण्यात आली़ आता या पदाधिका:यांनी राजिनामे द्याच असा पवित्रा काहींनी घेतला आहे.प्रगत महाराष्ट्र, त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर अस्वच्छतेत दुस:यास्थानी तर उत्तर प्रदेशातील गोंडा शहरासारखी स्थिती या शहराची झाली असल्याने चीड निर्माण झाली आहे.समितीच्या निकषांमध्ये पालिका ठरली फेल केंद्रीय समितीच्या कुठल्याही निकषांमध्ये भुसावळ पालिका बसली नाही़ घंटागाडय़ा नाहीत वा घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही तसेच ओला व सुक्या कच:याचे वर्गीकरण होत नाही तसेच गटारींची दररोज स्वच्छता होऊन कचरा गोळा केला जात नाही, वा त्याच्यावर प्रक्रियादेखील होत नाही. शिवाय सार्वजनिक शौचालयांची प्रचंड दुरवस्था झाल्यानंतर हे चित्र पाहून अधिकारीदेखील अवाक् झाले होत़े केवळ रस्त्यांची दररोज होणारी स्वच्छता एवढय़ाच काय त्या निकषात पालिका बसली़
सत्ताधारी, विरोधकांचे एकमेकांवर खापर
By admin | Published: May 05, 2017 12:15 AM