जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील खान्देश मॉल, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका, पांडे डेअरी चौकमार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून शिवाजी चौक नंतर खान्देश मॉल येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत रनर्स ग्रुपचे सदस्य, शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह तहसीलदार वैशाली हिंगे, प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहण, पोलीस निरीक्षक गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने संख्येने सहभागी झाले होते. एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.
राष्ट्रीय एकता दौड मध्ये धावले अवघे जळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:58 PM