शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

रुपयांतील अस्थिरतेने सोने-चांदीत चढ-उतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:20 PM

लग्नसराईमुळे सोन्याला मागणी कायम

जळगाव : डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने सोने-चांदीतही अस्थिरता निर्माण झाली असून त्यांचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहे. मे महिन्यात तर ३२ हजार १०० तर कधी ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचलेल्या सोन्याच्या भावात सतत चढ-उतार दिसून आला. चांदीला मागणी नसल्याने आठवडाभरात चांदीचे भाव ५०० रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजार कोसळत आहे तर मुंबई शेअर बाजारात उत्साह असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम होण्यासह डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने त्याचा सोने-चांदीवर परिणाम होत आहे.मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुपयांचे दर बदलत आहे. सध्या एका डॉलरचा दर कधी ७० रुपये तर ६९ तर कधी त्यापेक्षा वाढत आहे. यामुळे सोने-चांदीही अस्थिर झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीच्या दिवशी सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत गेली. लग्नसराईमुळे या मागणीत मोठी भर पडत असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत. ७ मे रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा असलेले सोने ८ रोजी ३२ हजार २०० रुपये प्रती तोळा, ९ रोजी ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा अशी वाढ होऊन १४ रोजी ते ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. १५ रोजी यात १०० रुपयांनी घसरण होऊन ते ३२ हजार ८०० रुपयांवर आले. त्या नंतर २० रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ७४ पैशांनी सुधारणा होऊन ७०.३४ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे भाव ६९.६० रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात ३०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ६०० रुपयांवरून ३२ हजार ३०० रुपयांवर आले. या पाठोपाठ २३ रोजी ६९.६४ रुपये असलेले अमेरिकन डॉलरचे भाव २४ रोजी ६९.५२ रुपयांवर आले. याचा परिणाम म्हणून सोनेही एकाच दिवसात १०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३२ हजार ३०० रुपयांवरून ३२ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर रुपयात घसरण होत जाऊन २८ रोजी डॉरलचे भाव ६९.६५ रुपये, २९ रोजी ६९.८२ रुपये झाल्याने सोन्याचे भाव वाढत जाऊन ते पुन्हा ३२ हजार ६०० रुपयांवर गेले आहे.चांदीत ५०० रुपयांनी घसरणसोन्या सोबतच चांदीतही अस्थिरता आहे. गेल्या आठवड्यात चांदी ५०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली. ३१ रोजीदेखील चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर कायम आहे.लग्नसराईमुळे सध्या सोन्याला चांगली मागणी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांतील चढ-उतार यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव