यावल : यावल येथील ग्रामीण रुग्णालय वा:यावर आहे. रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णालयात उपचारांसाठी आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांच्यात सतत संघर्ष होत आहे.दरम्यान, आज उपचारासाठी आलेल्या किनगाव खुर्दचे माजी सरपंच सिराज पिंजारी यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले नसल्याच्या कारणावरून माजी सरपंचासह त्यांचे भाऊ उपसरंपच राजू पिंजारी यांनी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा:यांना मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचा:यांनी रुग्णालयाचे कामकाज बंद करून रुग्णालयाला कुलूप ठोकले आहे. तालुक्यातील किनगाव खुर्द येथील माजी सरपंच सिराज नसीर पिंजारी यांचा अपघात झाल्याने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर डय़ूटीवरील कर्मचारी कक्षसेवक मोहन चौधरी यांनी प्रथमोपचार केले. त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जात नसल्याचा पिंजारी आरोप करत आरडाओरड करत पिंजारी व त्यांचे भाऊ उपसरपंच राजू पिंजारी यांनी मोहन विठ्ठल चौधरी यांना व आयसीटीसी समुपदेशक वसंत संदानशिव यांना मारहाण करत अधिपरिचारिका शीतल ठोंबरे यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. आम्ही सरपंच/उपसरपंच आहोत. तुम्ही येथे कसे राहता, तुमच्या बदल्या करतो अशा धमक्या दिल्या. अशी फिर्याद वसंत संदानशिव यांनी दिल्यावरून माजी सरपंच सिराज पिंजारी व उपसरपंच राजू पिंजारी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सुनीता कोळपकर करीत आहेत. रुग्णालय कर्मचारी वसंत संदानशिव यांचा सायंकाळी रक्तदाब वाढला. त्यांना तत्काळ 108 रुग्णवाहिनीद्वारे जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेनंतर रुग्णालयाला कुलूपया घटनेनंतर कर्मचा:यांनी दवाखाना बंद केला. रात्री उशिरार्पयत रुग्णालय बंदच होते. घटनेची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. देवाशिष घोषाल, जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आली आहे. सिव्हिल सजर्न डॉ. किरण पाटील बुधवारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी येणार असल्याचे कर्मचा:यांनी सांगितले. त्यानंतरच पुढील निर्णय कर्मचारी घेतील, असे सांगितले. परस्परविरुद्ध तक्रार दरम्यान उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आलो असता डय़ूटीवरील कर्मचा:यांनी तत्काळ उपचार केले नाही. त्याचा त्यांना जाब विचारला असता कर्मचारी शीतल ठोंबरे, वसंत संदानशिव, मोहन चौधरी व परिचारिका पूनम सोनवणे यांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार माजी सरपंच सिराज पिंजारी यांनी दिल्यावरून चौघांविरुद्ध अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालय प्रशासनात वारंवार खटके उडत असल्याने व संघर्षमय परिस्थिती निर्माण होत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले आहे.माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा..माजी सरपंच सिराज पिंजारी व उपसरपंच राजू पिंजारी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार सुनीता कोळपकर करीत आहेत.
यावलचे ग्रामीण रुग्णालय वा:यावर
By admin | Published: March 01, 2017 12:07 AM