शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जळगावात भरधाव डंपर ट्रॅव्हल्सवर धडकले; २७ प्रवासी गंभीर जखमी

By सुनील पाटील | Published: August 01, 2024 4:19 PM

जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांसह दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता वावडदा-वडली रस्त्यावर झाला. जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ ट्रॅव्हल्स ( क्र.एमएच १९ वाय ३३५९) पाचोऱ्याकडून जळगावला येत होती तर कडीचा कच भरुन डंपर वावडदाकडून वडलीकडे भरधाव वेगाने जात असताना वळणावर डंपरने (एम.एच.१९ सी.एक्स २५७७) बसला जोरदार धडक दिली. त्यात बस एका दिशेने चक्काचूर झाली. तर डंपरही चालकाच्या दिशेन चक्काचूर झाला. यात बसमधील २५ प्रवाशांसह चालक व क्लिनर जखमी झाला तर डंपरचा चालकही जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच वडली व वावडदा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिका तसेच मिळेल त्या वाहनाने सरकारी व खासगी रुग्णालयात रवाना केले. यातील २५ जणांवर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

असे आहेत जखमीसरुबाई विठ्ठल केळकर (वय ६०,रा.पाथरी, ता.जळगाव), संदीप सुधाकर सोनगे (वय २०,रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८), रंजना पुना पाटील (वय ४५), आशा अशोक पाटील (वय ४०), आक्का वसंत पाटील (वय ५०), मनिषा विनोद पाटील (वय ३८), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५), संजय महाजन (वय ५०), वैभवी दादाभाऊ पवार (वय १६) सर्व रा.नांद्रा. ता.पाचोरा),  सराबाई विठ्ठल देवकर (वय ६५, रा.वावडदा), इंदूबाई बिरबल राठोड (वय ३६) करण बिरबल राठोड (वय १८, रा.धानवड, ता.जळगाव), अंजना श्रीकृष्ण माळी वय ४५),श्रीकृष्ण माळी (वय ५३ कुऱ्हाड, ता.पाचोरा), नितीन सुभाष पाटील (वय ३५,रा.वडली,) अशोक महारु राठोड (वय ३२), सिंधूबाई पाटील (वय ६५), प्रकाश वसंत बोरसे (वय ५६), रवींद्र अर्जुनसिंग राजपूत (वय ५५), शिवनंदन शालिक पवार (वय ३०), प्रतिक संजय खेडकर (वय ३६), पुजा कैलास पाटील (वय ३८)व वंदना सूर्यकांत धनगर (वय ४०)

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव