जळगाव- घरामध्ये नेहमीचं होणाऱ्या कौटूंबीक वादाच्या कलहातून निर्दयी बापाने स्वत:च्या पोटच्या सात वर्षीय मुलीला बांभोरी पुलाखाली गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे़ कोमल संदीप चौधरी (वय-७) असे मयत मुलीचे नाव असून संदीप यादवराव चौधरी (वय-३५, रा़ हिरा गौरी पार्क, खोटेनगर) असे हत्या करणाºया निर्दयी बापाचे नाव आहे़ त्याला गुरूवारी दुपारी पारोळा येथून अटक करण्यात आली तर त्याने चौकशीत मुलीची हत्या केल्याचीही पोलिसांना कबुली दिली़अधिक माहिती अशी, अमळनेर तालुक्यातील करणगाव येथील मुळ रहिवासी संदीप यादवराव चौधरी हा खोटेनगरात पत्नी नयना आणि मुलगी कोमल यांच्यासोबत राहतो़ दरम्यान, संदीप हा दीड वर्षापासून जळगावात वास्तव्यास असून दादावाडीजवळील एका वेल्डींगच्या दुकानात कामाला आहे़क्लासमधून घेतले मुलीला ; दप्तर तेथेच सोडलेसंदीप याची मुलगी ही वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनिअर केजीला शिक्षण घेत होती़ दरम्यान, बुधवारी दुपारी कोमल ही क्लासला गेली होती़ त्यातच संदीप हा सुध्दा दुपारी बैठकीला जात असल्याचे पत्नीला सांगून घराबाहेर पडला़ त्यानंतर संदीपने क्लासमध्ये जावून मुलगी कोमलला सोबत घेतले. मात्र, मुलीचे दप्तर सोबत घेतले नाही़ दप्तर क्लासमध्ये सोडून दिले़रात्री सुरू झाली शोधा-शोधमुलगी आणि पती रात्रीचे १० वाजून सुध्दा घरी पतरले नसल्यामुळे पत्नी नयना ही चिंतेत होती़ त्यानंतर तिने त्वरित नातेवाईकांना संपर्क साधून पती व मुलगी अद्याप घरी न आल्याचे सांगितले़ त्यामुळे काही वेळामध्ये नातेवाईकांनी खोटेनगर गाठून दोघांचा शोध घेण्यास सुरूवात केली़ मात्र, दोघे मिळून न आल्याने त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द हरविल्याची माहिती दिली़अन् मेसेज आला, मुलीला पुलाजवळ मारून टाकले आहे तर मीही आत्महत्या करतो आहे़़़मुलीला क्लासमधून घेवून गेल्यानंतर संदीप याने आपला मोबाईल बंद केला होता़ त्यामुळे त्याचा थांगपत्ता लागत नव्हता़ मात्र, गुरूवारी सकाळी अचानक त्याने ज्या वेल्डींग दुकानावर कामाला आहे, त्या दुकान मालकाच्या मोबाईलवर मेसेज करून सांगितले की, मी माझ्या मुलीला बांभोरी पुलाजवळ मारू टाकले आहे तर मी सुध्दा पारोळा येथील शासकीय आयटीआयजवळ आत्महत्या करीत आहे़ नंतर त्याने पुन्हा मोबाईल बंद केले़ हा मेसेज पाहताच दुकान मालकाने संदीपच्या पत्नीला संपूर्ण प्रकार सांगत पोलिसांना माहिती दिली़बांभोरी पुलाखाली आढळला मृतदेहसंदीप याने मुलची बांभोरी पुलावजळ हत्या केल्याची माहिती नातेवाईकांसह पोलिसांना कळताच त्यांनी बांभोरी पुलाच्या दिशेने धाव घेतली़ त्यानंतर शोधा-शोध सुरू केल्यानंतर कोमल हिचा मृतदेह बांभोरी पुलाच्या खाली पोलिसांना आढळून आला़ यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला़ तर कोमल हिचे मामा, काकांनी तिचा मृतदेह ओळखला़पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावबापाने मुलीची हत्या केल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, एलसीबीचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, लाससिंग पाटील, प्रफु ल धांडे, वासु मराठे, प्रितम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली़ तर फॉरेन्सीक पथक व ठसे तज्ञांचे पथक सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यानंतर मुलीजवळ असलेल्या रक्ताचे नमूने घेण्यात आले तर काही वस्तू जप्त करण्यात आल्या़बघ्यांची जमली प्रचंड गर्दीलहान मुलीची बापाने हत्या केल्याची वार्ता पसरताच पुलाखाली बघ्यांची प्रंचड गर्दी जमली होती़ त्यामुळे अनेकांनी महामार्गाच्या बाजुला वाहने उभी केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही विस्कळलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली़निर्दयी बाप पारोळ्यात असल्याची मिळाली माहितीमुलीची हत्या करणाºया बापाला अटक करण्यासाठी पोलिसांनी तपासचके्र फिरविले़ त्यातच संदीप याचे लोकेशन हे पारोळे येथे असल्याचे दाखविल्यानंतर पोलिसांनी त्वरित पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांना माहिती दिली़ कानडे यांनी त्वरित पोलीस कर्मचारी पंकज राठोड व सुनील साळुंखे यांच्यासह संदीप याचे नातेवाईक दिनेश चौधरी याच्या मदतीने खूनी संदीप याचा शोध घेण्यास सुरूवात केली़आणि आयटीआयजवळून केली अटकसंदीप चौधरी पारोळ्यातील आयटीआयजवळ दारूच्या नशेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यांनी त्वरित आयटीआय गाठून त्याला अटक केली़ त्यानंतर त्यास तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़कसा केला खून, चौकशीत सांगितले पित्यानेपोलिसांनी संदीप याला विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने स्वत:च्या पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली़ त्यानंतर त्याने सांगितले की, मुलीला क्लासमधून घेवून जाऊन रिक्षाने बांभोरीपुलापर्यंत नेले़ नेहमीच संदीप व त्याचे पत्नीचे घरात वाद होत होते़ त्यामुळे कौटूंबीक कलहाच्या संतापातून मुलगी कोमल हिला पुलाखाली नेवून तिचा गळा आवळून खून केल्याचे त्याने सांगितले़ त्यानंतर खाजगी वाहनाने धुळे येथे जावून धुळे बसस्टॉपवर मुक्काम केला व नंतर गुरूवारी पहाटे ४़३० वाजता धुळे ते पारोळा असा बसने प्रवास करून पारोळे येथे आला व नंतर दुकान मालकाना मुलीचा खून केल्याचा मेसेज केल्याचे त्यांनी सांगितले़