जळगाव : गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदतीसाठी शिष्यवृत्ती वाटप करण्याचा एस-डी सीडचा हा सुंदर कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. देश घडविणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर भारत व भारतासाठी एक भाग्यविधाता घडविण्याचा हा कार्यक्रम आहे, आहे असे गौरोद्वार लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी काढले. फक्त शिक्षण हेच असे एक माध्यम आहे, की जे जग बदलू शकते. काम कोणतही लहान नसत. आपल्यामुळे काम मोठ होत असत, हा विचार हणमंतराव यांनी देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत गरजू आणि गुणवंत अशा ६०० विद्यार्थ्यांना रविवार, १८ रोजी सकाळी महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात मोठ्या थाटात शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले, त्या वेळी तो बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक व भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे), माजी मंत्री सुरेशदादा जैन, एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्नाभाभी जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, राजा मयूर, मेजर नाना वाणी, माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड उपस्थित होते.‘लोकमत’ने हुनरबाज लोकांना शोधलेसमाजातील हुनरबाज लोकांना शोधणे हे ‘लोकमत’चे एक काम महत्वाचे. लोकमत ने हणमंतराव यांना शोधले. ‘महाराष्टÑीयन आॅफ दी इयर’ पुरस्कार त्यांना दिला. स्वच्छ भारताची संकल्पना हणमंतराव यांनी पूर्वीच पाहिली. तरूणांना, आयएएस, आयपीएस लोकांनाही दिशा दिली. महाराष्टÑासाठी, मराठीसाठी ही गर्वाची गोष्ट आहे की, राष्टÑपती भवन, संसद, पंतप्रधान निवासस्थान असेल, रेल्वे स्टेशन असतील, तेथील हाऊसकिपींगचे काम हणमंतराव यांच्या बीव्हीजी गृपकडे आहे.नॉलेजेबल टीचर्सची गरजदेशात, जगात अनेक लोक शिष्यवृत्ती देतात. अजिम प्रेमजींनी जर चांगले विद्यार्थी निर्माण करावयाचे असतील तर तशा सुविधा देणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळेत जर चांगले विद्यार्थी असतील. तर चांगले विद्यार्थी निर्माण होतील. ‘गुड गव्हर्नन्स’म्हणतो तसे गुड टीचर्स, नॉलेजेबल टीचर्सची गरज आहे. हे काम अजिम प्रेमजींनी केले. त्यांनी १ लाख शिक्षक तयार केले.बील गेटस् यांची पहिली मुलाखत ‘दीपोत्सव’लाबिल गेटस व मिलिंडा गेटस यांनी देशातील मासिकाला दिलेल्या मुलाखतीतील पहिली मुलाखत ही ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला दिल्याचे सांगून विजय दर्डा म्हणाले की, या दाम्पत्याने त्यांच्या फाऊंडेशनमार्फत काम करण्यासाठी भारताची निवड केली. त्यातही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात विशेष कार्य केले. या तीन राज्यातील गावांमध्ये या राज्यांचे मुख्यमंत्री देखील फिरले नसतील, इतक्या मिलिंडा गेटस् फिरल्या असल्याचे सांगितले. त्यांनी दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठीही सहकार्य केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणे गरजेचेसर्वात महत्वाचे मार्गदर्शन आहे. शिक्षण मिळाल्यानंतर पुढे काय करायचे? हे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. ते काम एस.डी. सीड करीत आहे. ही कौतुकाची बाब आहे.फक्त पंडित नेहरूंकडे होते शिक्षणाचे व्हिजनविजय दर्डा म्हणाले की, देशत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षणाबाबत जे व्हीजन होते, त्यामुळेच आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था निर्माण केल्या. सीएंसाठी कार्य झाले. त्यानंतर देशात कोणतेही काम या क्षेत्रात झाले नाही. काँग्रेस असो की सध्याचे सरकार, कोणत्याही सरकारचे या शिक्षणाकडे लक्ष नाही. ही संपूर्ण शिक्षणपद्धतीच मोडीत काढली पाहिजे. कारण शिक्षणच जग बदलू शकते. मात्र त्यासाठी संशोधनात, माणसांमध्ये गुंतवणूक करावी लागते. ते काम अमेरिकेत होत असल्याने आपल्याकडील हुशार विद्यार्थी तिकडे जातात. आपल्याकडे मात्र लॉर्ड मेकॅलेने दिलेली शिक्षणपद्धतीच कायम आहे. भाषा, पोषाख बदललाय. ब्रिटीशांची सत्ता आजही आपल्या मनांमधून जिवंत आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे.भारतीय संस्कार, संस्कृतीला महत्वदर्डा म्हणाले की, भारतीय संस्कार व संस्कृतीला जगात फार महत्व आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या आपल्या पंतप्रधानांजवळ इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ही बाब कबूल केली. आपल्या संस्कार, संस्कृतीतील प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. लुुगान विद्यापीठ तुलनेने खूप खर्चिक आहे. ५५० वर्ष जुनी आहे. मात्र तेथे भेट दिली असता ३९ भारतीय विद्यार्थी असल्याचे समजले. मात्र त्यांना हे परवडू शकत नाही हे लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता समजले की विद्यापीठात जगभरातील ७३ देशांमधून येतात. त्यांच्यात भारतीय संस्कृती कशी जाईल, भारतीय सभ्यता कशी जाईल यासाठी भारतातील १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून हे ४० विद्यार्थी निवडले असून त्यांना शिष्यवृत्ती देऊन येथे आणल्याचे सांगितले.मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलाआजही भारतात सर्वच समाजात असलेला मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. माझा स्त्री शक्तीवर विश्वास आहे. जर मुली शिक्षीत होतील, तर समाज बदलेल. मी जळगावचा आभारी आहे, त्यांनी मला जळगावची मुलगी माझी पत्नी म्हणून दिली. बदल करण्यात जळगाव नेहमी अग्रेसर. ज्योत्स्ना यांनीही लोकमत सखीमंचच्या माध्यमातून हजारो भगिनींचे जीवन बदलले. आजही ३ लाख महिलांची ही संस्था प्रभावीपणे काम करीत आहे.स्पष्टपणाची किंमत मोजलीतदर्डा म्हणाले की, सुरेशदादा राजकारणी असूनही त्यांनी या कार्यक्रमापासून राजकारण्यांना मात्र दूर ठेवले आहे. कारण राजकारणी सोयीने बोलतील. सुरेशदादा स्पष्ट बोलतात. त्याची किंमतही त्यांनी मोजली आहे. त्यामुळेच त्यांनी राजकारण्यांना या चांगल्या उपक्रमापासून दूर ठेवून रघुनाथ माशेलकर, हणमंतराव गायकवाड यांच्यासारख्या लोकांना या कार्यक्रमांना बोलविले.समाजाचे देण लागतो- सुरेशदादा जैनआपण समाजाला काही देण लागतो, या प्रेरणेतून या उपक्रमाला सुरूवात झाली. आज या उपक्रमाला ११वर्ष पूर्ण झाली. ३१ हजार विद्यार्थ्यांना ट्रेनींग दिले. ३१०० विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नोकरीला लागले. अभ्यासिका, दत्तक योजना या माध्यमातून ही संकल्पना अधिकाधिक विस्तारण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुस्तक तुला केली. ती पुस्तके आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. गांधीजींचा विचार होता. व परंपरा वडिलांपासून घरात होतील. जेवढे लागत तेवढ ठेवाव. बाकीच्या संपत्तीचे ट्रस्टी म्हणून रहावे. जेवढे समाजाला देता येईल, तेवढे द्यावे. गेल्या ५० वर्षात माझ्याकडे कुणी आला व त्याला मदत केली नाही, असे क्वचितच घडले असेल. आजही राजकारणात अॅक्टीव्ह नसेल किंवा आमदार नसेल तरीही आमदारपेक्षा लोक कमी प्रेम करतात, असे नाही. आयुष्यात यशस्वी व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा पुढील पिढीला, विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी प्रयत्न असतो. आतापर्यंत १३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. आज ६०० विद्यार्थ्यांना देत आहोत.अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न आहे.‘लोकमत’ जीवनाचा भागरोज सकाळी उठले की ‘लोकमत’ची आठवण होते. इतका ‘लोकमत’ समाजाच्या जीवनाचा अविभाज्य बनला असल्याचे सुरेशदादांनी यावेळी आवर्जून सांगितले.विद्यार्थ्याने व्यक्त केले मनोगतयावेळी शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला जयेश मोराणकर या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. घरची गरीबीची परिस्थिती असताना केवळ एस.डी. सीडच्या शिष्यवृत्तीमुळेच इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणे शक्य झाल्याचे सांगितले. तसेच भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावर आपणही एस.डी.सीडच्या कार्यात आर्थिक योगदान देऊ, असे जाहीर केले.
एस-डी सीडचा उपक्रम देश घडविणारा - विजय दर्डा यांचे गौरोद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 7:27 PM
जळगावात एस.डी.सीडतर्फे ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळ््यात मार्गदर्शन
ठळक मुद्दे‘लोकमत’ने हुनरबाज लोकांना शोधलेबील गेटस् यांची पहिली मुलाखत ‘दीपोत्सव’लाफक्त पंडित नेहरूंकडे होते शिक्षणाचे व्हिजन