लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.5 : येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचा:यांच्या निवासस्थान बांधकाम निविदा प्रक्रियेतून शासनाचे 76 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आमदार स्मिता वाघ यांनी राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येणा:या येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकाम निविदा प्रक्रियेतून शासनाचे सुमारे 76 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले होते. विभागाचे कार्यकारी अभियंता मोराणकर यांनी या निविदा प्रक्रियेत मर्जीतील ठेकेदाराला संबंधित कामाचा ठेका मिळावा यासाठी अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा जास्तीच्या दराने काम दिले आहे . त्यामुळे शासनाचे सुमारे 76 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. सदरच्या घोटाळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत आमदार स्मिता वाघ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या कडे 22 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती, व सदर बांधकामाची आयआयटीमार्फत (पवई) उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे आता चौकशीचे आदेश झाले आहेत.
सा.बां. सचिवांना निविदा प्रक्रीयेच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:59 PM
अमळनेर येथील पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम निविदा प्रक्रीयेत घोळ झाल्याबाबत आमदारांनी केलेल्या तक्रारीची मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देनिविदा प्रक्रीयेतील घोळामुळे शासनाला 76 लाखांचा चुना लागल्याचा होता आरोपलोकमतने फोडली होती वाचा, आमदार स्मिता वाघ यांनीही केली होती तक्रार