भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. तसेच भुसावळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
भुसावळातील सचिन चौधरी यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 3:23 PM