न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : गुरुवर्य स.गु.शा.नीलकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी सद्गुरू स्मृती महोत्सव न्हावी येथे प्रारंभ झाला. २४ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाºया या महोत्सवात आध्यात्मिक कार्यक्रमांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.सकाळी आठला वैदिक मंत्रांसह कथा मंडपाचे मुख्य प्रवेशद्वार, पुरुष प्रवेशद्वार व महिला प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. फुग्यांद्वारा सद्गुरू स्मृती महोत्सवाचा संदेश पवित्र संत तथा यजमानांद्वारा आकाशात पसरविण्यात आला. देश-विदेशातील भक्त, संत, यजमानांच्या हस्ते १०० वातीच्या मोठ्या समयीत वैदिक मंत्रासह दीपप्रज्वालन झाले. श्रीमद् भागवताचे पूजन, संहितेचे पूजन, वक्ताश्रीचे पूजन, संतांचे सन्मान, संतांचे आशीर्वाद इत्यादी कार्यक्रम झाले.वक्तश्री शास्त्री भक्तीप्रकाशदासजींनी प्रथम सत्रात मार्गदर्शन केले. श्रीमद् भागवत हा ग्रंथ मनुष्य जीवन सुखी करण्याची औषधी आहे. भौतिक जीवनात आपण बाह्य दृष्टीने खूप सुखी झालो. परंतु आंतरिक शांती प्राप्त करावयाची असेल तर हा श्रीमद् भागवत ग्रंथच देऊ शकेल. श्रीमद् भागवताच महात्म्य गान केले.स.गु.शा.धर्मप्रसाददासजी अध्यक्षस्थानी होते. शास्त्री नौतमप्रकाशदासजींनी मंगल आशीर्वाद दिले. शा.बालकृष्णदासजी (मेतपूर), शा. धर्मस्वरूपदासजी (मुंबई), सद्गुरू गोविंदप्रसाद स्वामी, शा. पुरुषोत्तमप्रकाशदासजी (सुरत), के.के. शास्त्री (वासद), सरजू शास्त्री, भास्कर भगत, के.एन.शास्त्री, हरिप्रसाद स्वामी (रामनगर), पार्षद शरद भगत, राजेन्द्रप्रसाद स्वामी, वासुदेव स्वामी आदी संत उपस्थित होते.आठवडाभर चालणाºया या कार्यक्रमास अमेरिका, मुंबई, सुरत, अहमदाबाद तसेच देश-विदेशातील भक्त उपस्थित आहेत.
यावल तालुक्यातील न्हावी येथे सद्गुरू स्मृती महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 5:42 PM
गुरुवर्य स.गु.शा.नीलकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी सद्गुरू स्मृती महोत्सव न्हावी येथे प्रारंभ झाला.
ठळक मुद्देदेश-विदेशातील भक्त, संत, यजमानांच्या हस्ते वैदिक मंत्रासह दीपप्रज्वालन२४ ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या महोत्सवात अनेक सामाजिक उपक्रमफुग्यांद्वारा सद्गुरू स्मृती महोत्सवाचा संदेश आकाशात पसरविण्यात आलाअमेरिका, मुंबई, सुरत, अहमदाबाद तसेच देश-विदेशातील भक्त उपस्थित