परीक्षेत एकूण ८८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचे प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे : आकांक्षा जगदीश पाटील (९६ टक्के), टीना रवींद्र पाटील (९१.४० टक्के), उदय गुलाब पाटील (९०.२० टक्के), उदयराज देविदास सोनवणे (८९.८० टक्के), मनीष भाऊसाहेब भोसले (८९.६० टक्के).
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव डॉ. पूनम पाटील, प्रशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, केंद्रप्रमुख अशोक खेडकर व विद्यालयाच्या प्राचार्य आर.आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी.पी. पवार यांनी अभिनंदन केले आहे.