शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

धनत्रयोदशीचा साधला मुहूर्त :  ३०० चारचाकी, ७०० दुचाकींची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:59 AM

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

जळगाव : दीपावली पर्वातील खरेदीसाठी अनन्य साधारण महत्त्व असलेल्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी शहरातील दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन ग्राहकांनी गजबजून गेले होते. दीपावलीच्या पहिल्याच खरेदी मुहूर्तावर तब्बल ३०० चारचाकी, ७०० दुचाकींची विक्री होऊन एलईडीसह सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी राहिली. सोबतच कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होऊन संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहन बाजार सुसाटधनत्रयोदशीला सोन्यात मोठी उलाढाल होण्यासह दुचाकी, चारचाकीचा बाजारदेखील गजबजला होता. यामध्ये एकाच दालनामध्ये ३५० दुचाकींची विक्री झाली. इतर दालने मिळून ७०० दुकानांची विक्री झाली. तसेच ३०० चारचाकींची विक्री झाली. यात एकाच दालनातून १७३ चारचाकी विक्री झाल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे बुकिंग करण्यात आलेल्या चारचाकींची संख्या पाहता चारचाकी कमी पडल्या. दिवाळीपर्वासाठी एकाच दालनात ३५९ चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.एलईडीला अधिक मागणीइलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडीला मोठी मागणी राहिली. या सोबतच फ्रिज, वाशिंग मशिन यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होऊन जवळपास ३०० मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.कपडे, फटाके खरेदीचीही लगबगबाजारपेठेत कपडे खरेदीसाठीदेखील ग्राहकांनी गर्दी केली. यामध्ये रेडीमेड कपड्यांना अधिक मागणी राहिली. दिवाळीचा आंनद साजरा करण्यासाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांवरही गर्दी असून नवीन विविध प्रकारच्य फटाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे.वाहनांच्या रांगागेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरेदीचा खोळंबा होत असल्याने शुक्रवारी पावसाने उसंत दिली व सर्वांना दिलासा मिळाला. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहने लावण्यास जागाही कमी पडत होती. संध्याकाळी तर विविध चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिस्क वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहिला. विविध योजनांचाही ग्राहकांकडून फायदा घेतला जात आहे.- महेंद्र ललवाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.चारचाकीच्या खरेदीस मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी एकाच दिवसात १७३ चारचाकींची विक्री झाली.- उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.धन्वंतरीचे पारंपरिक पद्धतीने पूजनधनत्रयोदशीला धन्वंतरीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर घरातील धनाची देखील यावेळी पूजा करुन आरोग्यासह सुखसमृद्धी नांदावी. यासाठी प्रार्थना करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव