अमळनेर : राज्यातील सरकार अस्थिर असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक पात्र व अपात्रतेच्या फेºयात अडकून पडले आहेत. त्यामुळे १० महिन्यांपासून नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नाही.शहरातील व्यापाऱ्यांची अतिक्रमणे हटवणे थांबवल्याच्या कारणावरून विरोधी पक्ष नेते प्रवीण पाठक यांच्यासह सलीम टोपी, सविता संदनशिव या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व २२ नगरसेवक अपात्र करण्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे केली होती. भाजप मधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसून २२ नगरसेवक जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरवले. त्यावर तत्कालीन नगरविकास राज्यमत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा शिरीष चौधरी यांच्या गटाने उच्च न्यायालयात वाद नेऊन दुसºयांदा उपनगराध्यक्षांसह २२ नगरसेवक अपात्र करण्यात आले. यानंतर पुन्हा नगरसेवकांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांनीही त्यावर ठोस निर्णय न घेता राखीव ठेवला. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मंत्र्यांचे अधिकारही संपुष्टात आले. याचा फायदा घेऊन विरोधी गटाने आहे त्या संख्येत उपनगराध्यक्ष निवड व नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याची खेळी घडवून आणली.२२ नगरसेवकांबाबतचा निर्णय तत्कालीन नगरविकासमंत्र्यांनी राखीव ठेवल्याने हे नगरसेवक अपात्रही नाहीत आणि पात्रही नाहीत अशा स्थितीत अडकले आहेत.पात्र-अपात्रतेचा हा पेच निर्माण झाल्यामुळे मागच्या मंजूर निविदांवर कामे सुरू आहेत. मात्र सर्वसाधारण सभा होत नसल्याने काही निर्णय घेण्यास अडचणी येतात. ही अस्थितरता लवकर दूर व्हावी, ही अपेक्षा आहे.- शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, अमळनेरजिल्हाधिकाºयांना नगराध्यक्ष अपात्र करण्याचा अधिकार नसल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला आहे. एक कोटी पर्यंतच्या निविदा उघडण्याचा, कामाचा आदेश देण्याचे अधिकार तसेच तातडीच्या व आवश्यक बाबीत निर्णय घेण्याचे अधिकार नगराध्यक्षांना असल्याने काही प्रमाणात कामे सुरू आहेत.- पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर नगरपालिका
२२ नगरसेवक अडकले पात्र-अपात्रतेच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 9:14 PM