जळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा नामफलक असलेल्या जागी दरवर्षी मैदानात खेळणारी मुले मोठा भगवा झेंडा लावतात. यंदाही ते खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेला झेंडा लावला होता. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी हा झेंडा काढुन टाकायला लावला. त्यावेळी खेळाडूंनी विचारणा केली असता. येथे कोणताही झेंडा लावायचा नाही, असे उत्तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा क्रीडा संकुलात दर वर्षी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मैदानात खेळणारे सर्वच खेळाडू एक मोठा भगवा झेंडा जेथे स्टेडिअमचा नामफलक आहे. तेथे लावतात. त्याप्रमाणे यंदाही काही तरुण या ठिकाणी झेंडा लावण्यासाठी गेले होते. मात्र त्यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दीक्षित यांनी त्यांना झेंडा लावण्यापासून रोखले. तसेच येथे कोणताही झेंडा लावायचा नाही, अशा शब्दात सुनावले.
कोट - शासकीय इमारतीवर फक्त राष्ट्रध्वज फडकवला जातो. इतर कोणताही झेंडा फडकवला जात नाही. त्यामुळे झेंडा लावण्यास आलेल्या मुलांना तेथे झेंडा लावु दिला नाही - मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी.