डोंगर कठोरा : यावल येथील साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली. १०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे असल्याचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी सांगितले.व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, केंद्रप्रमुख महंमद तडवी, विजय ठाकूर, प्रमोद सोनार, प्रमोद कोळी, सुलोचना धांडे, मुख्याध्यापक सुरेश वाघ, बाळू पाटील, गणेश गुरव, प्रमोद जोशी आदी उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करून स्वाध्याय नोंदणी मोबाईलवर करून ते सोडून घेणे गरजेचे आहे. तसेच तालुक्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वांनी ओळखपत्राचा वापर करावा. तालुक्याचे आधार कार्ड नोंदणीचे काम ८६.५६ टक्के इतके झालेले असून उर्वरित नोंदणीसाठी शाळांना सूचना देण्यात आले आहेत. सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात स्वाध्याय योजना, शालेय पोषण आहार योजना, आधार नोंदणी, सरल प्रणाली, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, तंबाखूमुक्त शाळा अभियान, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, जलजीवन मिशन, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच तंत्रस्नेही शिक्षक व बीआरसीचे विषयतज्ञ किशोर चौधरी, समाधान कोळी, राहुल पाटील, शेवाळे, वरडकर आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी नईम शेख. सोबत जयंत चौधरी आदी मान्यवर.
यावल येथे साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 5:43 PM
साने गुरुजी विद्यालयात मुख्याध्यापकांची सहविचार सभा मंगळवारी झाली.
ठळक मुद्दे१०० टक्के विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व स्वाध्याय नोंदणी करून सोडवून घेणे गरजेचे : गटशिक्षणाधिकारी नईम शेख सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा