रावेर, जि.जळगाव : तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना अनुबोध करणाºया संत मुक्ताई तथा अडाणी असताना जगाला जगण्याचे तत्वज्ञान देणाºया कवयित्री बहिणाबाई यांचा बोध घेवून क्रांती करणाºया कालच्या स्त्रीने मूल्याधिष्ठीत शिक्षणाची कास धरून व जन्मजात असलेली शक्ती आत्मसात करून उंच भरारी घेतली तर आपण उद्याच्या भावविश्वाचे खरे मार्गदर्शक ठराल, असे प्रतिपादन बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी केले.रंगपंचमी व्याख्यानमालेतील स्त्री : काल, आज आणि उद्या या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. जळगावचे भवरलाल अॅड.कांताई जैन फाऊंडेशनने हे व्याख्यान प्रायोजित केले होते.प्रारंभी व्याख्याते डॉ.राजेंद्र फडके, नीलेश पाटील, राजेंद्र कोल्हे, सचिन जाधव व मनोज पाठक यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. दरम्यान, श्रध्दा महाजन, कृष्णाली राजपूत, वेदिका डेरेकर, जान्हवी मटकरी,आदिती लाड, सौम्या भडांगे, वेदिका चौधरी, सायली वाघ, जान्हवी चौधरी, वेदिका पटेल या कन्यांचे कन्यापुजन करण्यात आले. तद्नंतर नगरसेविका शारदा चौधरी, कल्पना पाटील, जयश्री कुलकर्णी, वर्षा राजेश महाजन, जयश्री अशोक शिंदे, कांता युवराज बोरा, आशालता राणे, मंजुषा शशांक बोरकर, संगीता प्रशांत पासे या महिलांचा सत्कार करून नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक किरण नेमाडे यांनी केले. सूत्रसंचालन विठोबा पाटील यांनी तर आभार अनिल महाजन यांनी मानले.
संत मुक्ताई व कवयित्री बहिणाबार्इंचा बोध घेतल्यास उद्याच्या भावविश्वाच्या मार्गदर्शक ठराल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:35 AM
रावेर , जि.जळगाव : तब्बल १४०० वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना अनुबोध करणाºया संत मुक्ताई तथा अडाणी असताना जगाला जगण्याचे ...
ठळक मुद्देरावेर येथे रंगपंचमी व्याख्यानमालेत डॉ.राजेंद्र फडके यांचे प्रतिपादनस्त्री : काल, आज आणि उद्या या विषयावर गुंफले तिसरे पुष्प