संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील विटनेर येथे माघ शु. अष्टमी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी विटनेर येथील जागृत देवस्थान गावाचे परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव भरत आहे.या यात्रा उत्सवाला ऐतिहासिक व पौराणिक असा इतिहास आहे. संत श्रावणबाबांचे संजिवन समाधी स्थान असलेले तापीकाठावरील कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेले लहानसे पण आदर्श गाव म्हणजे विटनेर. या विटनेर गावाने तालुक्यापासून थेट राजधानी दिल्लीपर्यंत मजल मारून पंचक्रोषीत स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने एकमेकांच्या हातात हात घेवून सुखदु:खात सहभागी होतात. अनेक चढउतार या गावाने पाहिले आहेत. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा येथील मातीला लाभली आहे. दरवर्षी आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला पायी दिंडीचे आयोजन केले जाते. प्रत्येक एकादशीला किर्तन तसेच हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. रोज प्रभातफेरी व हरिनाम पठण होते त्यामुळे हरिपाठ आबालवृध्दांच्या मुखोद्गत आहे. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा पारायण असे विविध संस्कारक्षम उपक्रम येथे वर्षभर राबविले जातात. ज्यामुळे नवीन पिढीवर आपोआप संस्कार होत आहेत.यात्रेसाठी पूर्ण गाव १० दिवस अगोदर एकत्र येवून पूर्ण गावाची सफाई व घरांची रंगरंगोटी केली जाते. तापी काठावर निसर्गरम्य वातावरणात नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो. त्यात वरणभात, बट्टी, वांग्यांची भाजी असा स्वादीष्ट मेनू असतो. येथील प्रसादाला विशिष्ट अशी चव असते. या दहा दिवसात कुणीही बाहेरचा पाहूणा उपाशी जात नाही. नोकरी किंवा व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले ग्रामस्थ सूटी काढून गावातील यात्रेला हजेरी लावतात. पूर्ण गावात उत्साह ओसंडून वाहतो.परिसरातील दुकानदार आपली दूकाने थाटतात. मिठाई, खेळणी यांची रेलचेल असते. मनोरंजनासाठी चार तमाशाफडाचे आयोजन असते. अगदी स्वयंशिस्तीत हा उत्सव पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ सक्रिय सहभाग घेतात.परिसरातील अंजती वढोदा दगडी मोहिदा होळनांथा वाळकी कुसुंंबा, घोडगाव, गलंबी, कलाली, हिंगोणा, अनवर्दे या गावांचे नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.माजी जि.प.सदस्य व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा इंदिराताई पाटील यांचे कुशल नेतृत्व गावाल लाभले आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटीवर पूर्ण महिलाराज आहे. गावात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी भव्य सभागृह बांधून गावाची सोय केली आहे. स्त्रीपुरूष समानता वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून गावाचा सर्वांगिण विकास होत आहे. परिसरात आदर्श गाव म्हणून नावलौकिक आहे.
चोपडा तालुक्यातील विटनेर येथे रविवारी संत श्रावणबाबा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:12 AM
विटनेर येथे माघ शु. अष्टमी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी विटनेर येथील जागृत देवस्थान गावाचे परम दैवत संत श्रावणबाबा यात्रोत्सव भरत आहे.
ठळक मुद्दे१० दिवस भरते यात्रायात्रोत्सवामुळे गावासह परिसरात उत्साहाचे वातावरण