जळगाव : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान शिर्डी$चे साईबाबा यांनी ‘सबका मालिक एक’ असा संदेश देत सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सर्व धर्माचा आदर करून बंधूभाव निर्माण झाला पाहिजे, असे सांगत भजन संध्यामधून बॉलिवूड प्लेबॅक सिंगर आणि इंडियन आयडॉल फेम मुकेश पंचोली यांनी मराठी, हिंदी भजन शनिवारी सादर केले. या हिंदी, मराठी गीतांमधून साईबाबांची महिमा वर्णण्यात आली.धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित ‘ब्रह्मोत्सव’ यावर्षी २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला असून या धार्मिक उत्सवात जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. येथे सद््गुरु साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा १७ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. महोत्सवात सकाळी पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी (नाशिक) यांनी मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजा केली.शनिवारी दुसऱ्या दिवशी मुकेश पंचोली यांनी भजन संध्या सादर केली. त्यात त्यांनी चढता सूरज धीरे धीरे, दिवाना तेरा साई, मेरे घर के आगे साईराम तेरा मंदिर बन जाये, ओ पालन हारे अशी विविध भक्ती गीते सादर करीत वातावरण भक्तीमयी केले. संगीताच्या तालात भाविकांनीदेखील प्रतिसाद देत भजन संध्येला स्मरणीय केले. यासह खेळ मांडला, मोरया मोरया गजानना या मराठी भक्तिगीतांनी देखील भाविकांची मने जिंकून घेतली. साईबाबांसह हिंदी व मराठी चित्रपटातील भक्तीगीतांनी पाळधीची संध्याकाळ प्रसन्न झाली होती.मुकेश पंचोली यांना नितीन साणवेकर यांनी तबल्यावर, मोनी दाते यांनी आॅर्गन की बोर्ड, संजीव उत्पल यांनी ढोलक पॅडवर, बेंजोवर राम वाघमारे, परकेशनवर प्रशांत मोरे यांनी साथसंगत केली. राहुल सुवारे, दिव्या वर्मा यांनी सहगायन केले.आज महाभिषेकरविवारी, २९ रोजी परमभक्त हनुमान, साईबाबा, गायल माताजी यांचा सकाळी ९ वाजता पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून संध्याकाळी ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मेरे घर के आगे साईराम.....’ हिंदी, मराठी गीतांमधून उलगडली साईबाबांची महिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:31 PM