भुसावळ : महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून साकेगाव बस स्थानकावर उड्डाणपूल करण्यात आला आहे. यामुळे बस ही स्थानकावर न येता पुलावरून गेल्यामुळे स्थानकावर वाट पहात उभे असलेल्या विद्यार्थ्यांचा दहावी-बारावीच्या परीक्षेसासाठी अखेर खाजगी वाहनाने जावे लागले.साकेगाव बसस्थानकावर वांजोळायाकडे जाण्यासाठी अंडरपास देण्यात आला असून स्थानकासमोर उड्डाणपूल देण्यात आला आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी पुलाखाली स्थानकावर बसची वाट पाहत असताना एकही बस सर्विस रोडवरून न येता सर्वच बस उड्डाणपुलावरून गेल्यामुळे ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांकडे केवळ बसचे पास होते व जवळ पैसे नसल्यामुळे खाजगी वाहनाने जाऊ न शकल्यामुळे बस येण्याची ते वाट बघत होते. बस स्थानकावर उभ्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता शेवटी अगदी पेपरला अर्धा तास बाकी असताना गोरगरीब विद्यार्थ्यांना वाहनाची व्यवस्था करून दिली व परीक्षा केंद्रापर्यंत सोडून दिले.वेळेवर विद्यार्थ्यांना वाहनांची मदत मिळाली नसती तर आयुष्याला कलाटणी देणारे दहावी-बारावीच्या पेपरला त्यांना मुकावे लागले असते.
बेससअभावी साकेगावचे विद्यार्थी मुकणार होते परिक्षेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 10:16 PM