खान्देशातील वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठय़ा डौलाने अमळनेरच्या सखाराम महाराजांच्या खांद्यावर तळपताना दिसतो. सखाराम महाराजांमुळे अमळनेर ही भक्तीपंढरीची पेठ बनली आहे. अमळनेरपासून तीन मैल अंतरावर असलेल्या चिखली नदीच्या काठी पिंपळी गावात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 1757 साली सखारामचा जन्म झाला. पिता रामभट व माता सीताबाई. बालपणीच मातृ-पितृछत्र हरपले. सावत्र आई नानूबाईसोबत सखाराम चुलतभाऊ रंगनाथकडे रहाण्यास गेले. गंगाबाईंशी विवाहबद्ध झाले. एरंडोलच्या रघुनाथ स्वामी महाराजांनी हाक मारली. त्यांनी अडावद गावी निवास करणा:या श्रीनिवास महाराजांकडे जायची सूचना केली. श्रीनिवास महाराजांनी गुरूपदेश केला.
अमळनेरजवळील अंबर्षी टेकडीवर तपाचरणात सिद्धयोगी महादेव बुवांनीही सखाराम महाराजांना अध्यात्म विद्येत साह्य केले. सखाराम महाराजांच्या वंशवेलीवर पुष्प आले. पण त्यांचे लक्ष श्री विठ्ठलाच्या समचरणी लीन होते. प्रतिवर्षी पंढरपूरला वारीसाठी निघताना स्वहस्ते आपली कुटी जाळण्याचे सखाराम महाराजांचे साहस पाहू जाता संत कबिरांची ‘जो घर जालै आपना चलै हमारे साथ’ ही उक्ती आठवते. मुलगा वारला. प}ी निवर्तली. सखाराम आता आशापाशापासून सर्वार्थाने मुक्त झाले.
सखाराम महाराजांची शिष्य परंपरा समृद्ध आहे. ते स्वत: मुल्हेर गादीचे शिष्य होते. सखाराम महाराजांनी खानदेशात एक देदीप्यमान वलय उभारले. भक्तीच्या क्षेत्रात अभिनव भावजागरण केले. सखाराम महाराजांचे शिष्योत्तम श्री गोविंद महाराज मालेगावच्या राजेबहादुरांचे अमळनेर येथील खास कारभारी म्हणून काम पहात असत. 1851 साली बाळकृष्ण महाराजांच्या गळ्यात गुरुपदाची माळ घालून गोविंद महाराज ईश्वरचरणी लीन झाले.
श्री बाळकृष्ण महाराजांचे मूळ गाव मलकापूर. देशस्थ ऋग्वेदी ब्राrाण शाखेतील खानझोडे, देशपांडे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. धरणगावच्या सीतारामबुवांनी सुचवल्यावरून आर्थिक घडी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 1875 साली प्रल्हाद महाराजांजवळ आपला अमूल्य भक्तिवारसा सोपवून बाळकृष्ण महाराजांनी जीवनलीला संपवली.
भूमपरांडे गावचे माध्यंदिन शाखेचे शुक्ल यजुव्रेदी ब्राrाण गोपाळ यास सखाराम महाराजांची बहीण बहिणाबाईंची मुलगी भीमा दिली होती. यांचे पुत्र प्रल्हाद महाराज होत. प्रल्हाद महाराजांनी सखाराम महाराजांच्या समाधीजवळ गोविंद महाराजांची समाधी बांधली. बाळकृष्ण महाराजांच्या समाधीच्या बांधकामास आरंभ केला. पंढरपूरला सखाराम महाराज मठ बांधण्यास आरंभ करण्यात आला.
पूज्य सखाराम महाराजांच्या समकालीन संत मंडळात अमळनेरचे महादेवसिद्ध आणि लक्ष्मीकांत, सखाराम शिष्योत्तम टिकंभटजी डांगरकर, गोविंदा लोंढारी, धरणगावचे गणेशोपासक योगविद्यासंपन्न कोमटी महाराज, धरणीधर स्वामी, कमळाकर, चोपडय़ाचे गोविंदबुवा, दुसखेडय़ाचे बाळानंद, जळगावचे केशर गिरी, नगरदेवळ्याचे लाडशाखीय किसनजी, शेंदुर्णीचे कडोजी बाबा, जामनेरचे गोविंद महाराज आणि महाराजांचे सुपुत्र तोताराम महाराज अशी नावे येतात. ही संत परंपरा अजूनही यात्रेकरूंची वाट बघत आहे. या संत परंपरेचे वैशिष्टय़ असे की, ही परंपरा जनताभिमुख आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन काठांचे नेमके अनुसंधान जोडून देणारी आहे. यासंदर्भात विठ्ठलभक्ती आणि जीवनातले सार सर्वस्व कळण्याची कळ साधते. साने गुरुजींसारख्या आणि देशाभिमुखता याचा परिचय होतो. खानदेशातून आपल्या वज्र सामथ्र्याने काम करणा:या या संत परंपरेची खूप दीर्घकालीन प्रशस्ती आहे. श्री सखाराम महाराजांची शिष्यपरंपरा 1757 सालापासून सुरू होते.