ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.20 - तालुक्यात 118 ग्रामपंचायती मध्ये फक्त 79 ग्रामसेवक कार्यरत असतानाही संघटनेचे अध्यक्ष संजय भाईदास पाटील यांना कोणतीही ग्रामपंचायत न देता, काम न करता वेतन दिले जात असल्याची तक्रार पिंपळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज बाळकृष्ण महाजन यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांकडे लेखी स्वरूपात केली आहे
पिंपळी येथील तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिका:यांच्या आदेशाने तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारीनी निलंबित केले होते. 7 ते 8 महिन्यांपूर्वी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. तरी त्यांना कोणतीही ग्रामपंचायत दिलेली नाही. ते संघटनेचे अध्यक्ष आहे म्हणून दबावापोटी त्यांना ग्रामपंचायत सजा दिलेली नसून आर्थिक व्यवहाराचाही आरोप महाजन यांनी केला आहे. तसेच वासुदेव हरी मारवडकर या ग्रामसेवकाला कोणतीही चौकशी न करता राजकारण व आर्थिक व्यवहारापोटी निलंबित करण्यात आले त्याची ही चौकशी करण्यात यावी. सडावण येथील ग्रामसेवकला शासकीय सेवेत असताना राजकीय प्रचारात भाग घेऊन निवडणूक आचार संहितेचा भंग केल्यामुळे निलंबनाची कारवाई केली होती परंतु याची नोंद न घेता त्यांची हजेरी व पगार काढलेला दिसून येत आहे त्यामुळे दोन्ही ग्रामसेवकांचे मानधन आणि पगार गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांकडून का वसूल करू नये याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत ग्रामसेवक संजय भाईदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.