जळगावात प़ ऩ लुंकड कन्या शाळेत शालेय साहित्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:19 PM
बेकायदेशीर शालेय साहित्यांची विक्री केली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाला मिळाली़
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21- प़ऩलुंकड कन्या शाळेत पाचवी ते दहावीच्या विद्याथ्र्याकडून पैसे वसूल करुन त्यांना बेकायदेशीर शालेय साहित्यांची विक्री केली जात असल्याची माहिती शिक्षण विभागाला मिळाली़ त्यानुसार शिक्षणाधिका:यांनी गुरुवारी कारवाई करुन दोन लाखाचे शालेय साहित्य सील केले आह़े दरम्यान या संस्थेचे अध्यक्ष अॅड़सुशील अत्रे यांनी असा कुठलाही प्रकार शाळेत घडला नसून शिक्षण विभागाने आकसबुध्दीने कारवाई केल्याचे सांगितल़ेप़ऩलुंकड कन्या शाळेत पाचवी ते आठवीच्या विद्याथ्र्याकडून प्रत्येकी 160 रुपये घेण्यात आले व त्यांना कार्यानुभव, चित्रकला व निबंधलेखन अशा तीन वह्यांची विक्री जात होती़ तर नववी व दहावीच्या विद्याथ्र्याकडून प्रत्येक 300 रुपये वसूल करुन त्यांनाही कार्यानुभव, चित्रकला व निबंध लेखन अशा तीन वह्यांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना मिळाली होती़शालेय साहित्याची शाळेत विक्री करण्यास बंदी आह़े, असे असतानाही असा प्रकार सुरु होता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यावेळी विद्याथ्र्याचे जबाब नोंदिवले असून कारवाईची चित्रफित केली असल्याची माहिती महाजन यांनी दिली़