बोदवड : तालुक्यातील साळशिंगी येथील गट क्रमांक २७२ मध्ये सुभद्राबाई टिल्लू महाजन यांच्या शेतातून साडेचार क्विटंल कापूस चोरटयांनी लंपास केला.शेतात कापूस चांगला फुटला असता मजूर नसल्याने महाजन यांनी दुसऱ्या दिवशी कापूस वेचणी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार दुसºया दिवशी सकाळी शेतात निवृत्ती महाजन हे पत्नी मुलासह कापूस वेचणीला गेले असता एका रात्रीत पूर्ण शेतातीेल कापूस वेचून चोरटे पसार झाले असल्याचे आढळले. यात सदर शेतकºयाचा सुमारे साडेचार क्विंटल कापूस वेचून नेला असून यात सदर त्यांचे सोळा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तर तालुक्यात शेतातून कापूस चोरून नेण्याची ही दुसरी घटना असून सध्या सर्वत्र शेतात कापूस फुटला असून कापूस चोरीच्या घटना वाढायला सुरवात झाली आहे, याप्रकरणी ३७९ नुसार कापूस चोरी चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साळशिंगी शिवारात साडेचार क्विंटल कापूस केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 10:15 PM