गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : जिल्हा परिषदेची प्राथमिक कन्या शाळा, मुलांची शाळा, भराडी वस्तीशाळा, श्रीकृष्ण वस्तीशाळा ह्या चारही शाळांचा संयुक्तपणे बालगोपाळांचा रंगारंग, कलागुणाना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम जि.प.मुलांच्या शाळेत पार पडला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमा पूजन तसेच स्वागत गीताने सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकासराव पाटील अध्यक्षस्थानी होते.महाराष्ट्राच्या लोककलांबरोबर शहिद जवानांना श्रद्धांजलीपर गीतात शहिद जवानाच्या पार्थिवाला सलामी तसेच मानवंदना, विधवा पत्नीचा आक्रोश हुबेहुब दाखवण्यात आला.खान्देशातील पारंपरिक विरांच्या वेशात हुबेहुब संबळ वाद्यावर भराडी वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.याचबरोबर गरबा, मद्यपी नवरा, भारुड यासारखे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता पाटील, शेतकरी संघाचे माजी चेअरमन एकनाथ माळी, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच सतीश पाटील, दिनकर पाटील, विकासोचे चेअरमन सुभाष पाटील, व्हाईस चेअरमन पीतांबर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील, विनोद चौधरी, कमळाबाई महाजन तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक भगवान पगारे, कन्याशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे, प्रवीणसिंग राजपूत, माधव वाघ, सिंधू अंभोरे, सत्यभामा पाटील, अरुणा बाविस्कर, विनोद पाटील, विलास मोर,े कैलास पवार, राकेश पाटील, आनंदा पाटील, सुदाम पाटील, भारती अहिरे, सुनीता सैंदाणे, तुकाराम चौधरी आदी उपस्थित होतेप्रास्ताविक तुकाराम चौधरी, सूत्रसंचालन प्रभावती पाटील व प्रवीण पाटील यांनी, तर आभार कन्याशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी मानले.
चिमुकल्यांच्या देशभक्तीला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 5:41 PM
जिल्हा परिषदेची प्राथमिक कन्या शाळा, मुलांची शाळा, भराडी वस्तीशाळा, श्रीकृष्ण वस्तीशाळा ह्या चारही शाळांचा संयुक्तपणे बालगोपाळांचा रंगारंग, कलागुणाना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम जि.प.मुलांच्या शाळेत पार पडला.
ठळक मुद्देबालगोपाळाच्या कलागुणांचा रंगारंग कार्यक्रममुलांच्या सादरीकरणामुळे उपस्थितही भारावले