भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक ०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प झाली होती.समर स्पेशल बरौनी-लोकमान्य तिलक टर्मिनस सुविधा एक्सप्रेस या गाडीचा पिंपरखेड-नांदगाव दरम्यान खांबा क्रमांक २८६/६ जवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्यामुळे व चालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदगाव अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरावर असताना ही घटना घडली. डबा क्रमांक १६१२२चा चाक अचानक तुटला. शेवटून दुसरा डबा असल्यामुळे गार्ड डबा व अपघात ग्रस्त डबा जागेवरच वेगळे करून दीड तासानंतर गाडी मुंबईकडे धावली. नंतर अपघातग्रस्त दोन्ही डब्यांना तीन तासानंतर ताशी १५ किलोमीटरच्या वेगाने मशिनरीद्वारा नांदगाव यार्डात आणावे लागले.दरम्यान, या घटनेमुळे मुंबई रुळावरच्या अनेक प्रवासी गाड्यांना तीन ते चार तास उशिराने तत्काळ जागेवरच उभे राहावे लागले. यात भुसावळ, भादली, अकोला, मलकापूर याठिकाणी गाड्यांना उभे करावे लागले. गाडी क्रमांक १२१४१ पाटलीपुत्र-मुंबई, गाडी क्रमांक १२२९४, गाडी क्रमांक ११०६० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२२२२ हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस यासह गाडी क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर अनेक गाड्या उशिराने धावल्या.दरम्यान, नवीन एलएचबी कोचच्या चाकांना तडे जाणे, उष्णतेने चाक लाल होणे, चाक तुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.
समर स्पेशल सुविधा एक्सप्रेसचे चाक नांदगावजवळ तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 4:24 PM
०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प झाली होती.
ठळक मुद्देचालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळलातीन तास रेल्वे वाहतूक ठप्पभुसावळसह विविध स्थानकांवर प्रवासी खोळंबले