चाळीसगाव, जि.जळगाव : शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले.बुधवारी येथील गुजराथी शाळेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या वही महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे यांची विशेष उपस्थिती होती. वही महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांसह पालकांना मदत म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे प्रास्ताविकात कैलास सूर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी योगाचार्य वसंत चंद्रात्रे, नगरसेवक सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, भगवान राजपूत, दीपक पाटील, रामचंद्र जाधव, शेषराव पाटील, जि.प.चे माजी सदस्य मंगेश पाटील, दिनेश पाटील, विनोद पल्लण, आर.डी.चौधरी, श्याम देशमुख, प्रा. संजय घोडेस्वार, राकेश नेवे, नाना पवार, जयाजी भोसले, विश्वास चव्हाण, डॉ. रमेश निकम, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.
चाळीसगावात नवीन उपक्रम वही महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 6:20 PM
शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले.
ठळक मुद्देवही महोत्सवातून शेतकऱ्यांच्या मुलांना मदतमाजी मंत्री एम.के.पाटील यांचे गौरवोदगार