ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27 - दोन क्रमांकाचे एक मालवाहू वाहन पकडल्याची घटना ताजी असतानाच दुस:या दिवशी बुधवारी दुपारी एकाच क्रमांकाच्या दोन कार पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर आढळून आल्या. विशेष म्हणजे बनावट क्रमांक असलेली कार मुळ क्रमांक असलेल्या मालकानेच पोलिसांना पकडून दिलेली आहे. यात पोलिसांनी दोन्ही कारसह एका जणाला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रय} होत आहे.नगर येथून घेतली कारअहमदनगर येथून फायनान्स कंपनीकडून ही कार घेण्यात आलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे ही कार चोरीची आहे किंवा काय याबाबत माहिती मिळालेली नव्हती तर पोलिसांकडूनही माहिती लपविण्याचा प्रय} सुरु होता.मूळ मालकानेच पकडून दिली कारसंदीप राजाराम याज्ञिक (रा.संभाजी नगर, जळगाव) यांच्याकडे एम.एच.19 बी.यु.5535 या क्रमांकाची कार आहे. अशाच क्रमांकाची एक कार जळगाव शहरात असल्याचे त्यांना माहिती मिळाली. बुधवारी ही कार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लावलेली असताना याज्ञिक यांनी त्याच कारच्या शेजारी आपली कार लावून जिल्हा पेठ पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी दुस:या कारच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वारके सांगितले. या दोन्ही कार पोलीस स्टेशनला आणण्यात आल्या. याज्ञिक यांनी त्यांच्या कारचे मुळ कागदपत्रे सादर केल्याने त्यांची कार सोडण्यात आली तर वारके हा कारचे कागदपत्रे सादर करु शकला नाही.