जळगाव : कोरोना रुग्णालयात बुधवारी १५८ जणांची तपासणी करून ४० जणांना दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, ७२ जणांचे नमुने धुळे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून बुधवारच्या अहवालांसह ८१ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच अहवाल प्राप्त झाले.ते सर्व निगेटीव्ह आहेत.मंगळवारपर्यंत १४ अहवालाची प्रतीक्षा होती. त्यातील पाच अहवाल हे बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्राप्त झाले आहे.अजून ८१ अहवाल प्रलंबितत्यामुळे मंगळवारपर्यंतच्या ९ अहवालाची प्रतीक्षा होती बुधवारी एकत्रित ७२ अहवाल पाठवण्यात आले होते. त्यामुळे एकत्रित ८१ अहवाल प्रलंबित होते.रुग्ण वाढल्यास या कक्षाच्या मागील कर्मचारी निवासस्थान यात कोरोना कक्ष-२ मध्ये २० बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.दरम्यान, कोरोना चाचणीसाठी कोविड रुग्णालयात सकाळपासून काही लोक थांबलेले असतात. त्यांनाही बसण्यासाठी व्यवस्था रुग्णालयातर्फे करण्यात यावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.७ जणांची प्रकृती गंभीरकोरोना कक्ष एक मध्ये २१ बेडची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी बाधित २१ जणांना दाखल करण्यात आलेले आहे. यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असून काहींना आॅक्सिजन द्यावे लागत आहे. उर्वरित १४ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.पाच अहवाल निगेटिव्हकोरोना रुग्णालय प्रशासनाला बुधवारी सायंकाळी ५ अहवाल प्राप्त झाले. हे पाचही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी दाखल रुग्णांचे हे अहवाल असून यात बधितांच्या संपर्कातील अहवालाचा समावेश नाही.७२ जणांना सोडले घरीअहवाल प्रलंबित राहत असल्याने अनेक रुग्णांना घरी सोडण्यास रुग्णालय प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एकत्रित ५० अहवाल येत असल्याने. रुगांना घरी सोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी ७२ जणांना घरी सोडून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
एकाच दिवशी पाठविले ७२ जणांचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:04 PM