जळगाव : कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जळगाव शहर व एरंडोल येथे एकूण सहा ठिकाणांहून दुधाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.कोजागरी पौर्णिमेला दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे त्यात भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सोमवारपासून दुधाचे नमुने घेण्यात आले. यामध्ये सोमवार व मंगळवारी जळगाव शहरात चार ठिकाणांहून तर एरंडोल येथून दोन ठिकाणांहून दुधाचे नमुने घेतले गेले. या नमुन्यांची तपासणी करून काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. त्यासाठी हे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक विवेक पाटील, अनिल गुजर, सुवर्णा महाजन यांनी ही कार्यवाही केली.
कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात सहा ठिकाणी घेतले दुधाचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:57 AM