शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

वाळू लिलावाचा घोळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 12:14 PM

विश्लेषण

 सुशील देवकरमुख्यमंत्र्यांनी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केलेली असली तरीही वाळू गटांची मंजुरी झाल्याशिवाय ही मोफत वाळू उपसा करण्याची परवानगी देणे महसूल विभागाला शक्य होणार नसल्याने घरकूल योजनांचे काम वाळू अभावी रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे हरित लवादाने वाळू गटांना पर्यावरण विषयक मंजुरी देणाऱ्या जिल्हास्तरावरील कमिट्याच अवैध असल्याचे जाहीर केल्याने या कमिट्यांनी मंजूर केलेले वाळू गट रद्द झाले असून त्यांना आता राज्यस्तरावरील पर्यावरण समितीची मंज़ुरी घ्यावी लागणार आहे. मात्र तब्बल पाच महिन्यांपासून राज्य समितीची याबाबतची बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाळू गटांना आवश्यक असलेली राज्य पर्यावरण समितीची मान्यता गेल्या पाच महिन्यांपासून मिळू न शकल्याने खाजगी व शासकीय बांधकामांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच वाळूच्या चोरीचे प्रकार वाढले आहे. त्याआधी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळू ठेक्यांची मुदत संपत आलेली असतानाच नवीन ठेक्यांच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेत त्यास स्थगिती मिळविण्यात आली. दरवर्षी वेगवेगळ्या कारणांनी ही स्थगिती मिळविली जाते. जेणेकरून बाहेरच्या राज्यात वाळू ठेके असलेले ठेकेदार त्यांची वाळू जादा दराने राज्यात विक्री करू शकतील. हे घोळ सुरू असतानाच अवैध वाळू वाहतूक मात्र सर्रास सुरू आहे. त्यास आळा घालण्याची इच्छाशक्ती महसूल प्रशासनाची नाही. अन्यथा महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबवून या वाळू चोरीला सहज आळा घातला असता. मात्र ही यंत्रणाच इतकी कुजली आहे की, कारवाई करायला जाण्यापूर्वीच संबंधीत अवैध वाळू वाहतूकदारांना त्याची खबर पोहोचून जाते. यापूर्वी जिल्हाधिकाºयांनी याचा अनुभव घेतला होता. तर आता पोलीस अधीक्षकांनी मागील आठवड्यात राबविलेल्या मोहीमेतही याचाच अनुभव आला.दुसरीकडे वाळू व्यावसायिकांनी शासनाच्या वाळू धोरणाचा विरोध सुरू केला आहे. सुरूवातीला दोन हजार, तीन हजार, पाच हजार, मध्यंतरी पंचवीस हजार असलेला दंड वाढवून सध्या लाखांवर दंड वसुल करून वाळु व्यावसायिक व मजुरांना जिवन जगणे कठीण केले असल्याचा आरोप या व्यावसायिकांनी केला आहे. वाळुवर लादलेला निर्बंध बंदी उठवून व वाळु आयातीचा विचार थाबंवून वाळु धोरणात बदल न झाल्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जळगाव येथील कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशाराही या व्यावसायिकांनी दिला आहे. या सर्व घोळात बांधकाम व्यवसायाला मात्र फटका बसत आहे. अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी त्यांचे प्रकल्प पुढे ढकलले आहेत. शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.