जळगाव : जळगाव शहर परिसर व ग्रामीणभागातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल विभागाच्या पथकाने शहरात जवळपास २० ठिकाणी वाळू साठ्याची तपासणी केली. या कारवाईने अवैध वाळू उपसा करणाºयांचे धाबे दणाणले असून शनिवारी धाडी टाकण्यात आलेल्या ठिकाणच्या मालकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भरधाव वाळूच्या वाहनांमुळे दररोज अपघात होत असताना प्रशासन केवळ कारवाईचे नाटक करीत असून वाळू माफीयांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत करीत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने शनिवारी ‘वाळू माफियांसमोर प्रशासनाने टेकले गुडघे’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले व शनिवारी तीनही तलाठी व इतर कर्मचाºयांचे पथक नियुक्त करून त्यांना शहरातील वाळू साठ्यांची पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शहरात २० वेगवेगळ््या ठिकठिकाणी वाळू साठ्यांची पाहणी केली. या साठ्यांसंदर्भात तहसीलदार अमोल निकम यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असून त्या तयारदेखील करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार निकम यांनी सांगितले. संबंधितांना या नोटीस देण्यात येऊन त्यांच्याकडील पावत्या तपासण्यात येतीव व त्या नसल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांना सात दिवसात नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न दिल्यास वाळू साठा जप्त करण्यात येईल, अशीही माहिती महसूल सूत्रांकडून मिळाली.
जळगावात २० ठिकाणी वाळू साठ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:40 PM
प्रशासनाला आली जाग
ठळक मुद्देनोटीस तयारपावत्या नसल्यास दंड ठोठावणार