शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

राखीव गटातून उचल झालेली वाळू गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 1:03 AM

तीन हजार ब्रास वाळू

जळगाव : जिल्ह्यात वाळू चोरीचे प्रकार सर्रासपणे सुरू असताना आता तर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी राखीव असलेल्या आव्हाणी येथील गटातून उचल झालेली तीन हजार ब्रास वाळूच गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या गटातून उर्वरित वाळूची तत्काळ उचल करावी असे पत्र जिल्हा प्रशासनाकडून तापी महामंडळाला देण्यात आले आहे.जिल्ह्यातील शासकीय योजनांच्या कामासाठी प्रशासनातर्फे काही वाळू गट राखीव ठेवण्यात आले होते. बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा १ मधील जुनोने धरणाच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील सावखेडा, धरणगाव तालुक्यातील आव्हानी भुसावळ तालुक्यातील भानखेडे, जोगलखेडे, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, पातोंडी येथील गट राखीव म्हणून मंजूर करण्यात आले होते.यातील आव्हाणी वाळू गटाची किंमत ३ कोटी ५० लाख ९२ हजार ५८ रूपयांचा तापी खोरे सर्वेक्षण विभागातर्फे प्रशासनाच्या गौणखनिज विभागाकडे भरणा करण्यात आला होता. या गटात ७ हजार ९८६ ब्रास वाळूसाठा मंजूर करण्यात आला होता. चक्रधर कन्स्ट्रक्शनला या गटातून वाळू वाहतुकीचे काम देण्यात आले. आत्तापर्यंत तीन हजार ब्रास वाळूची उचल या गटातून झाली आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाळू गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. उचल झालेली वाळू नेमकी गेली कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.दरम्यान या वाळू गटाचा ठेका रद्द करावा, असे पत्र तापी पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनास दिले होते. मात्र ठेका रद्द करता येत नाही असे सांगत उर्वरित वाळू साठा तात्काळ उचल न केल्यास भरलेली रक्कम जमा केली जाईल असे पत्र आता तापी पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे. उर्वरीत वाळूदेखील गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्तअवैध वाळू वाहतूक सुरूच असून शनिवारीदेखील अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले. जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचा घटना दररोज समोर येत आहे. गेल्या आठवड्यात विदगाव येथे तापी नदी पात्रात व दापोरा येथे गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक रोखण्यावरून झालेले वादाच्या घटना ताज्याच असताना आता शनिवार, ६ रोजी पुन्हा तीन वाळू डंपर वाळू वाहतूक करताना आढळून आले.शनिवारी सकाळी बांभोरी, खेडी व आव्हाणे शिवारात वाळू वाहतूक करताना तीन डंपर आढळून आल्याने महसूलच्या पथकाने ते पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. सदरील डंपरवरवर दंडात्मक कारवाई केली जाणार असून त्यांचा पंचनामा करून तो तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याकडे देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह तलाठी व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव