ऑनलाईन लोकमत
ऐनपूर/सावदा ,दि.7 - केळी व्यापारी व ट्रान्सपोर्टचालक यांच्याकडून सुमारे दोन कोटी 81 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. यात व्यापारी व त्यांचे वडील या दोघांना फसवणूकप्रकरणी अटक करावी, या मागणीसाठी भुसावळच्या बांधकाम व्यावसायिक सानिया कादरी यांनी गुरुवारी दुपारपासून सावदा पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे.
सानिया कादरी यांनी सांगितले की, सावदा येथील ट्रान्सपोर्टचालक मयूर खंडेलवाल, कैलास खंडेलवाल व शेतकरी यांच्यात केळी खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला. यात आपण मध्यस्थ होतो. व्यवहार झाल्यावर 8 ते 10 दिवस त्यांनी शेतक:यांना पैसे दिले.
आतार्पयत एक कोटी 50 लाखांची रक्कम त्यांनी दिली. परंतु उर्वरित दोन कोटी 81 लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
मध्यस्थ असल्याने शेतक:यांचे नुकसान होऊ नये म्हणून सावदा पोलिसात अर्ज दिला होता. अद्यापपावतो गुन्हा दाखल झाला नाही म्हणून उपोषणास बसले असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणातील मयूर खंडेलवाल यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.