शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सामान्य जनतेसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:24 PM

रस्ते अपघातातील मृत्यूदर १४ टक्क्यांनी घटला

संजय पाटीलअमळनेर. जि. जळगाव : रस्त्यावरील प्रवाशांसाठी असो की घरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने गेल्या चार वर्षात तब्बल १ लाख १० हजार १४७ रुग्णांना सेवा दिली असून मागील वर्षी ३९१ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच करण्यात आली. यामुळे अपघात, माता व बाल मृत्यूदर कमी झाले आहेत.जळगाव जिल्ह्यात २६ बीएलएस तर ९ एएलएस म्हणजे अत्याधुनिक ज्यात शॉक देण्याची आणि कृत्रिम श्वास देण्याची सुविधा आहे अशा एकूण ३५ रुग्णवाहिका आहेत. शासनाने तातडीच्या सेवेसाठी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.१५ मिनिटात १०८ रुग्णवाहिका पोहचू शकते अशी व्यवस्था करून ठिकठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असून दिवसरात्र रुग्णांची सेवा केली जात आहे. यामध्ये २४ तास डॉक्टर उपलब्ध असल्याने आणि एका फोनवर रुग्णांना विनामूल्य सेवा दिली जात असल्याने यातून गेल्या चार वर्षात अपघातातील रुग्णांना तसेच गंभीर आजारी पडलेल्या रुग्णांना वेळीच सेवा मिळाल्याने मृत्यूदर घटला आहे. २०१६च्या तुलनेत २०१८मध्ये ४५ हजार ३९८ रुग्णांना १०८ने तात्काळ सेवा पुरवली आहे तर १०८ सुरू झाल्यापासून चार वर्षात सेवा घेणाºयांचे प्रमाण सहापट वाढले आहे आणि माता मृत्यूदर ७ टक्क्यांंनी कमी झाला आहे. बाळ मृत्यूदर ५ टक्यांनी कमी झाला आहे. रस्ते अपघातातील प्रमाण १४ टक्यांनी कमी झाले आहे.२९२८ अपघातातील रुग्णांवर उपचार२०१८ अखेर २९२८ अपघातातील रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालय पोहचविण्याचे काम १०८ ने केले आहे तर हल्ला झालेल्या ६४१ नागरिकांना दवाखान्यात नेऊन उपचार केले आहे. भाजण्याच्या बाबतीत २०१४पासून सर्वाधिक कमी रुग्ण २०१८ मध्ये होते. हृदयविकाराचे रुग्णही गेल्या चार वर्षात कमी झाले असून ४९ रुग्णांना वेळीच रुग्णालयात पोहचविण्यात आले आहे. पडण्यामुळे जखमी झालेल्या ८९० रुग्णांनी १०८चा लाभ घेतला आहे. विषबाधा झालेल्या १८२१ रुग्णांना प्राथमिक उपचार करून ताबडतोब दवाखान्यात पोहचविल्यामुळे अनेकांना वाचवण्यात यश आले आहे.८२५३ गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्याचे काम या जीवन वाहिनीने केले. त्यापैकी ३९१ महिलांची प्रसूती सुखरूपपणे १०८ रुग्णवाहिकेत करण्यात आली. विजेचा धक्का बसलेले ३९ रुग्ण आणि मोठ्या अपघातातील १८१ रुग्ण व इतर वैद्यकिय सेवा २७५३२ लोकांना पुरविण्यात आली. २९१०२ इतरांना तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ३२ जणांनाही वाचवण्यात १०८ व त्यावरील सेवा देणाºया डॉक्टरांना यश आले आहे. ७ रुग्णांना कृत्रिम श्वास पुरविण्यात आला आहे.१०८ रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर , शिरीन पंप, इन्फ्युजन पंप इत्यादी सुविधा असल्याने रुग्णाला तात्काळ उपचार सुरू होऊन त्याची मानसिकता प्रबळ होते. शिवाय वेळीच सेवा मिळत असल्याने रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. यामुळे मृत्यूदरही कमी झाले आहे.- डॉ. चेतन अग्नीहोत्री, जिल्हा व्यवस्थापक, १०८, आपत्कालीन व्यवस्था

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव