जळगाव : प्रेमप्रकरणातून पळून गेलेले प्रेमीयुगुल लगA करुन परत आले, मात्र कुटुंबाकडून होणारा विरोध व भीती यामुळे संरक्षणासाठी त्यांनी पोलिसांचा दरवाजा ठोठावला. दोन्ही कडील 50 च्यावर लोक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय व तेथून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोहचले. दुपारी 4 वाजेपासून सुरु झालेला हा गोंधळ रात्री आठ वाजेर्पयतही सुरुच होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रहिवाशी असलेला तरुण औषध प्रतिनिधी म्हणून काम करतो. त्याचे यावल तालुक्यातील एका तरुणीशी सुत जुळले. हे दोन्ही वर्षभरापूर्वी डी.एड.च्या शिक्षणासाठी सोबत होते. मुलगी जळगाव शहरातील एका वसतीगृहात तर मुलगा महाविद्यालयात जायचा. या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले. दोघांचा समाज वेगवेगळा व त्यातच मुलीचे वडील महसूल विभागात अधिकारी असल्याने विवाहाला विरोध होईल म्हणून दोघांनी पळून जावून लगA केले. आठ दिवसानंतर ते संरक्षणासाठी सोमवारी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्याआधी दोघांनी फैजपूर येथे प्रभारी अधिकारी व उपविभागीय अधिका:यांचीही भेट घेतली. मुलीचे वडील अधिकारी असल्याने स्थानिक पातळीवर आपल्याला न्याय मिळणार नाही यासाठी त्यांनी जळगाव गाठले.जोडपे अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कार्यालयात आल्याचे समजल्याने मुलीची आई, वडील व अन्य नातेवाईक तेथे आले. मुलीकडची गर्दी पाहून मुलानेही नातेवाईक बोलावून घेतले. त्यात सैन्य दलाच्या जवानाने पुढाकार घेतला. मुलीची आई हात जोडून सोबत चल, तुङो धूमधडाक्यात चांगल्या मुलाशी लगA लावून देईन म्हणून गयावया करीत होती. दरम्यान, मोक्षदा पाटील कार्यालयात नसल्याने त्यांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला कर्मचा:यांनी दिला. दोन्ही गट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आल्यानंतर मुलीकडील लोकांनी निरीक्षक एकनाथ पाडळे यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. मुलीच्या आईने दालनात हातपाय जोडून मुलीला घरी येण्याची विनंती केली, मात्र मुलीने पालकांना स्पष्ट शब्दात नकार दिला. अधिकारी बापानेही सर्व प्रय} केले, मात्र उपयोग झाला नाही.
‘सैराट’ जोडी संरक्षणासाठी पोहचली पोलीस ठाण्यात
By admin | Published: April 11, 2017 12:48 AM