आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : धाडसी घरफोडी व चोºयांमध्ये मास्टरमार्इंड असलेला कुंदनसिंग सुरजसिंग जुन्नी (वय २१, रा.चिंबी पाडा, अंबाडी रोड, भिवंडी जि.ठाणे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंदनसिंग याची जळगाव सासरवाडी असून सासºयाकडे मुक्कामाला असताना त्याने शहरात घरफोडी केल्याचा संशय पोलिसांना आहे, किंबहूना तसे तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंदनसिंग जुन्नी हा मुळचा भिवंडी येथील आहे. त्याने त्याचे साथीदार रामसिंग उर्फ चोनसिंग श्रीराम टाक व भूमीसिंग टाक या दोघांच्या मदतीने २०१५ मध्ये वसई येथील वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोती ज्वेलर्स (सातीवली नाका, ता.वसई जि.पालघर ) फोडून तेथून २० लाखाचे सोन्याचे दागिने व ६ लाखाची चांदी चोरुन नेली होती. या गुन्ह्यात तो अद्याप फरार आहे.
असा आला कुंदनसिंगवर संशय गेल्या वर्षी त्याने तांबापुरा येथील एका मुलीशी विवाह केला. त्यानिमित्ताने त्याचे जळगाव शहरात येणे-जाणे वाढले. तो जेव्हा शहरात होता,तेव्हा घरफोडीचे गुन्हे घडले आहेत. त्या काळात रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार कारागृह किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अटकेत होते. तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या वेळी पोलिसांनी जुन्नी याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी आणले तेव्हा त्याचा शालक पोलीस ठाण्यात जाब विचारण्यासाठी आला होता, त्यामुळे कुंदनसिंग याच्यावरच पोलिसांचा संशय होता. तो शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार नुरोद्दीन शेख व रवी पाटील यांचे पथक त्याच्या शोधार्थ पाठविले होते. मिळालेल्या गुप्त ठिकाणावरुन या पथकाने त्याला मध्यरात्री ताब्यात घेतले.
साथीदारांवर २१ ठिकाणीगुन्हे दाखलकुंदनसिंग व त्याच्या साथीदारांवर महाराष्टÑ व गुजरातमध्ये घरफोडी, दरोडा,चोरी, लुटमार, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे २१ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यात मनमाड, मनोर, डहाणू, वापी, बिल्लीमोरा, बारडोली, मिरा रोड, माणिकपुर, राहुरी, अहमदाबाद, भरुच, अंकलेश्वर आदी ठिकाणी हे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुनील कुराडे यांनी दिली. कुंदनसिंग याला द्रौपदी नगरातील मंगला कोष्टी यांच्याकडे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.रामानंद नगरच्या हद्दीतही सव्वा लाखाची घरफोडी झाली आहे, त्यात त्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे.