अमळनेर, जि.जळगाव : सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समिती आणि काच व फुलमाळी समाजातर्फेसावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. शहरातील माळी मढीत आयोजित या कार्यक्रमात साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीमाईचा जन्मोत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ.ए.जी.सराफ होते. प्रमुख पाहुणे सिंधू महाजन, मीना महाजन, भारती चव्हाण, मधुकर महाजन, गंगाराम महाजन, भूषण महाजने होते.तत्पूर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक दर्शना पवार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमिला महेश माळी या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मनोगत व्यक्त केले.ज्योती महाजन, सिंधू महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर चेतना माळी, आर्या शेलकर, ज्योत्स्ना प्रमोद महाजन, मोहिनी खैरनार, अनिता महाजन, मनीषा महाजन आदी महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रंजना महाजन, कीर्ती शेलकर, उदय खैरनार, रोहन वाडीले, निखिल पाटील, डॉ.लीना चौधरी, सोनाली पाटील, चेतन भोई, ज्योती बडगुजर, किशोर महाजन, आशा महाजन, चित्रकला महाजन, उज्वला महाजन, रत्नमाला महाजन, मीना महाजन, ललिता माळी, संगीता महाजन, किरण दहीवेलकर, कविता महाजन, महेश माळी आदींनी परिश्रम घेतले. उदय खैरनार यांनी आभार मानले
अमळनेरात सानेगुरुजी स्मारक समिती व माळी समाजातर्फे सावित्रीबार्इंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 3:33 PM
सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समिती आणि काच व फुलमाळी समाजातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.
ठळक मुद्देअमळनेरात काढली मिरवणूकसावित्रीबाई जन्मोत्सव पुस्तकाचे प्रकाशन