जळगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील २० कर्तृत्ववान महिलांचा सत्कार पर्यावरण शाळेत करण्यात आला.
यावेळी सहायक सरकारी वकील ॲड.अनुराधा वाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेचे सचिव संजय भावसार, प्रा.सोपान बोराटे, प्रकाश शिरसाठ, युवराज माळी,जळगाव जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके, जिल्हाध्यक्ष नाना पाटील उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
शिक्षण - प्रणाली शिसोदिया, अरुणा उदावंत,(पाचोरा), प्रभावती बावस्कर, वर्षा अहिरराव, छाया पाटील (किनगाव ). सामाजिक क्षेत्र : सुश्मिता भालेराव, वैशाली विसपुते, मिनाक्षी निकम (चाळीसगाव ), हर्षाली पाटील, मनिषा मेथाळकर. राजकीय - नगरसेविका सरीता नेरकर,मंगला बारी. वैद्यकिय- कविता नेतकर, सहकार सावित्री सोळुंके, स्वाती भावसार, पत्रकारीता धनश्री बागुल, नाजनीन शेख, पोलिस - यशोदा कणसे प्रकाशन - संगीता माळी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींच्या वतीने अरुणा उदावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रास्ताविक विजय लुल्हे यांनी केले. सुत्रसंचलन छाया पाटील यांनी केले.आभार विश्वजीत चौधरी यांनी मानले.
समीक्षा लुल्हेने केली आनंदघरला मदत
समीक्षा विजय लुल्हे ही दहावीच्या परिक्षेत खान्देशातून प्रथम आली होती. त्यानंतर तिला पुरस्काराच्या रुपाने मिळालेले २१०० रुपये तीने वर्धिष्णु या संस्थेच्या आनंदघर या उपक्रमाला दिले. तिच्या या संवेदनशीलतेचे कौतुक संस्थेचे संस्थापक अद्वैत दंडवते यांनीही केले आहे.