शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:15 AM

२० हजारापैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण

जळगाव : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावी परीेक्षेत मुलांपेक्षा सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदा देखील मुलीच हुशार ठरल्या आहे. जळगाव जिल्ह्यातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ व मुलांचे प्रमाण ८७.४५ टक्के आहे. जिल्ह्यात २० हजार ११३ पैकी १८ हजार ४३६ मुली उत्तीर्ण झाल्या तर २९ हजार ४४३ पैकी २४ हजार ६५३ मुले उत्तीर्र्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८९.७१ आहे.पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.नाशिक विभागातून सुमारे १ लाख ५७ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.जिल्ह्यातून ४२ हजार विद्यार्थीजळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ पैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३२०८ विद्यार्थी मेरीटमध्येजिल्ह्यातील ३ हजार २०८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या २ हजार १७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कला शाखेचे २३० विद्यार्थी देखील मेरीटमध्ये आले आहे. पहिल्या श्रेणीमध्ये १८ हजार ३१६ तर व्दितीय श्रेणीत १९ हजार ६३९ विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले.पास श्रेणीत अवघे ९७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.बारावी परीक्षेचा निकाल मिळताच विद्यार्थ्यांचा जल्लोषबारावीच्या परीक्षेत केसीई सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा देखील आपले वर्चस्व राखले आहे. या महाविद्यालयाचा निकाल ९७.२४ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा आयुष दिनेश येवले हा विद्यार्थी ९६़६१ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे़ तर वैष्णवी राहुल तोतले ९५़६९ टक्के मिळवून द्वितीय तर निकिता सोपान पाटील ९५़५३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत़ गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्याचे कळताच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसोबत पालकवगार्ची देखील धाकधूक वाढली होती. दुपारी एक वाजता निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनी घरीच मोबाईल, लॅपटॉपवर आॅनलाईन निकाल पाहिला़ अनेक विद्यार्थी निकाल पाहिल्यानंतर आपला आनंदोत्सव साजरा केला तर काहींनी निकाल सांगण्याकरिता अनेकांनी आपल्या नातलगांना फोन करून निकालाची बातमी दिली. तर पाल्याला चांगले गुण मिळाल्याने पालकांनी सुध्दा त्यास पेढा भरवून आनंदोत्सव साजरा कला़विवेकानंद महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.निकालास अडचणीदुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला़ परंतु, तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना बारावीचा निकाल हा उशिरा बघायला मिळाला़ काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी आपला निकाला पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला़

टॅग्स :Jalgaonजळगाव